Nashik News : नाशिकच्या (Nashik) महिंद्रा कंपनीतून (Mahindra Company) पाच लाखांच्या स्पेअर पार्ट चोरीचा उलगडा झाला असून कंपनीतील कामगारांनी हि चोरी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे पार्ट त्यांनी स्थानिक भंगार विक्रेत्याला विक्री केल्याची घटना समोर आली आहे. 


नाशिकच्या सातपूर (satpur MIDC) येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील व्हेरिटो कारसाठी तयार केल्या जाणाऱ्या फ्युएल इंजेक्टर या महागड्या सुट्या भागाची विक्री चोरी करून भंगार बाजारात विक्री केल्याचा प्रकार कंपनीतील कंत्राटी क्रमांक कामगारांकडूनच केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीतील तीन कंत्राटी कामगारांना शाखा युनिटच्या एकच्या पथकाने अटक केली असून पोलिसांनी चोरट्यांकडून सुमारे पाच लाखांचे सुटे भाग भंगार विक्रेत्यासह ताब्यात घेतले आहे. 


दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये संशोध गजानन रामभाऊ भालेराव, सिद्धार्थ उमाजी नरवडे व आकाश बाळू साळवे व संबंधित भंगार विक्रेता आताऊल्ला समशुल्ला खान यांचा समावेश आहे. महेंद्रच्या सीकेडी प्लॉटमधून 15 जुलै ते 5 ऑगस्ट कालावधीत वाहनांच्या इंजिनसाठी फ्लेवर इंजेक्टर पार्ट चोरून येण्याची तक्रार व्यवस्थापक प्रभाकर जाधव यांनी दिली होती. 


सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी प्रशांत मरकड यांनी गोपनीय माहिती मिळवली असता पथकाने त्या दिशेने तपास केला संशयतांची चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबड्डी देतात गुन्हा उघडकीस आला. 


नाशिकच्या सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मोठे बस्तान असून याचे गोडावून अनेक भागात विखुरलेले आहेत. उत्पादन अधिक असल्याने कामगार वर्गही मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या महिंद्रा अनेक गाडयांना विशेष मागणी असते. अनेक महिन्याच्या बुकिंगनंतर ग्राहकांना वाहन मिळत असते. अशातच आता स्पेअर पार्ट चोरण्याचा प्रकारामुळे कंपनी प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.