Nashik Krushi Pradarshan : नाशिक (Nashik) येथे डोंगरे वसतिगृह मैदानावर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवात (Krushi Festival) वधू वर मेळाव्यात पाच हजार जोडप्यांनी नोंदणी केली तर आठ जोडपे विवाह बंधनात अडकले. कन्यादान योजनेद्वारे नवदांपत्यांना संसारोपयोगी साहित्य प्रदान केले.


नाशिकमध्ये स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून कृषी प्रदर्शन सुरु आहे. या कृषी प्रदर्शनात अनोख्या सामुदायिक विवाह सोहळे (Wedding Ceremony) पार पडले. आज झालेल्या वधू वर मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद लाभला. जवळपास 5 हजार विवाहोच्छुक मुलामुलींनी आपली नावनोंदणी केली तर या वेळी झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात आठ जोडपी विवाह बंधनात अडकली. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी विनामूल्य विवाह नोंदणी व वधू-वर परिचय मेळावा झाला. सेवामार्गाच्या विवाह संस्कार विभागांतर्गत झालेल्या या मेळाव्यात पाच विवाहेच्छुकांनी नोंदणी केली गेली. या वधू-वर परिचय मेळाव्यात जुळलेल्या विवाहांपैकी आठ जोडप्यांचा विवाह देखील अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत झाला.


दरम्यान कन्यादान योजनेद्वारे नवदांपत्यांना संसारोपयोगी साहित्य प्रदान केले. महोत्सवामध्ये कृषीमार्ट लक्षवेधी ठरत आहे. मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांसाठी 'कन्यादान पुण्य महान'  हा उपक्रम घेतला. आज कळवण येथिल एग्रो केअर अँड क्रॉप सायन्स इंडस्ट्रीजचे संचालक भूषण निकम यांना 'कृषी माउली' पुरस्कारही प्रदान करण्यात आला. तसेच सामुदायिक विवाह सोहळ्यानंतर युवकांसाठी स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सध्या विवाह आणि रोजगार ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र स्वामि समर्थ सेवा मार्गातून या दोन्ही गोष्टी एकत्रित रित्या सोडविण्यासाठी काम सुरू आहे. हे सर्वात पवित्र असे काम आहे. तरुणांनी नोकरी न शोधता नोकरी देण्याची सामर्थ्य आपल्यात आणावे, आज शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी देतांना विचार केला जातो हे चुकीचे आहे, मुलगा बघतांना त्याची कमाई न बघता त्याची क्षमता, आचार, विचार, संस्कृती याचा विचार असे ज्ञानेश्वर बोडके म्हणाले. 


युवा उद्योजक मेळाव्याचे आयोजन 


स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे म्हणाले की, वधू वर सोहळे होणे आवश्यक आहे, त्या माध्यमातून दोन घरे जोडली जातात. तसेच आज युवकांना रोजगार मिळणं महत्वाचं आहे. युवा प्रबोधनाच्या माध्यमातून नैराश्यग्रस्त युवा-युवतींना ध्यान-धारणेची प्रशिक्षणे दिली जातात. व्यसनांमध्ये अडकलेल्या तरुणांना समुपदेशन करुन निर्व्यसनी केले जाते. फास्टफूडच्या आहारी जाऊन आपले आरोग्य संकटात टाकणार्‍या युवकांना चुकीच्या आहार-विहाराविषयी मार्गदर्शन केले जाते. नैसर्गिक आपत्तीमध्ये स्वत:सह संकटात अडकलेल्यांना कसे वाचवायचे याकरिता आपत्ती व्यवस्थापनावर मार्गदर्शन करुन शेकडो टीम्स करण्यात आल्या आहेत. गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेल्या युवा पिढीसाठी प्रबोधनाची चळवळ राबविली जाते. व्यसनमुक्तीसाठी 31 डिसेंबरच्या दिवशी ठिकठिकाणी पथनाट्य, नाटिका सादर करुन जनजागृती केली जाते.