Nashik Doctor Suicide : नाशिकच्या (Nashik) पंचवटी परिसरात (Panchavti Area) एका डॉक्टरांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पंचवटी परिसरातील चिंचपाणी येथील घरात सोमवारी साडे सात वाजता सुमारास बीएचएमएच डॉक्टरने (BHMS Coctor) गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. निलेश कुमार पोपटलाल छाजेड असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचे नाव आहे. 


पंचवटी परिसरातील चिंचपाणी येथील घरात सोमवारी साडे सात वाजता सुमारास बीएचएमएच डॉक्टरने जवळपास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आठ वर्षांपासून शहरातल्या एका नामांकित खाजगी रुग्णालयात छाजेड वैद्यकीय सेवा देत होते. दरम्यान कौटुंबिक कारणातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पंचवटी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मालेगाव स्टॅन्ड जवळील चिंचवड येथील धात्रक संकुलमध्ये डॉक्टर निलेश कुमार छाजेड यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. ते पंचवटी परिसरातील सुयोग रुग्णालयात जनरल प्रॅक्टिशनर म्हणून कार्यरत होते.  सोमवारी सकाळी घरात त्यांनी गळफास घेतल्याचे कुटुंबीयांनी पाहिले. 


कुटुंबियांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ छाजेड यांना ते कार्यरत असलेल्या रुग्णालयात नेण्यात आले. रुगणालयात दाखल केल्यानंतर डॉक्टर राठी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात तसेच वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान छाजेड यांच्या कुटुंबात काही महिन्यांपासून वाद सुरू होता. यात तणावातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा पंचवटी पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. पोलिसांचा तपास त्या दृष्टीने सुरू आहे. 


कौटुंबिक वादातून आत्महत्या?
निलेश कुमार पोपटलाल छाजेड हे डॉक्टर होते. ते गेल्या काही वर्षापासून नाशिकच्या एका रुग्णालयात जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम करत होते. मालेगाव स्टॅन्ड जवळील चिंचवड येथील धात्रक संकुलमध्ये डॉक्टर निलेश कुमार छाजेड यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. आठ वर्षांपासून शहरातल्या एका नामांकित खाजगी रुग्णालयात छाजेड वैद्यकीय सेवा देत होते. दरम्तयान कौटुंबिक वादातून घरात सातत्सेयाने भांडणे होत असल्चयाने छाजेड नैराश्यात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.