Nashik News : नाशिक (Nashik) शहर परिसरात चोरी, लुटमारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आज तर चोरांनी (Theft) कहरच केला. दोन तरुणाचे अपहरण केल्यानंतर त्यास मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. 


नाशिकच्या आडगाव (Adgaon) परिसरात ही घटना घडली आहे. मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास जयपाल गिरासे व ओंकार राऊत हे दोघे मित्र मोटार सायकल वरून जात असतांना त्यांना अज्ञात इसमांनी अडविले. त्यानंतर जवळील लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्यांचे कारमध्ये टाकून अपहरण केले.


दरम्यान अपहरण केल्यानंतर पुन्हा दोघांना मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याची चैन बळजबरीने काढुन घेतलेे. यानंतर संबंधित दोघा युवकांना टाकून देत संशयितांनी पळ काढला. याबाबत आडगांव पोलिसांत (Adgaon Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. या गुन्ह्याच्या तपासासाठी पथक तयार करण्यात आले. त्यानुसार तपास सुरू असताना संशयित दत्ता सारंग कुटे, निरंजन उर्फ पप्पु घेवर शेळके, आकाश राधाकिसन काळे यांना शिताफीने नाशिक, पंचवटी, औरंगाबाद रोड, साधुग्राम जुन्या बस स्थानकासमोर त्यांच्या ताब्यातील अल्टो कारसह ताब्यात घेण्यात आले. 


दरम्यान संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशी केली असता सोमनाथ कारभारी सानप,  प्रशांत सखाराम आहेर, निलु उर्फ निलेश कदम, सोमनाथ सानप याचा मित्र यांच्यासह केला आहे. संशयितांच्या ताब्यातून गुन्हयात वापरलेली एर्टिगा जप्त करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे संशयितांना ताब्यात घेवुन त्यांना पुढील तपासाकामी आडगांव पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


नाशिकमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट 
नाशिक (Nashik) शहरात गेल्या काही दिवसांपासुन गुन्हेगारीने (crime) चांगलंच डोकं वर काढलय. प्राणघातक हल्ले, चोऱ्या, घरफोडी असे प्रकार हे रोजचेच झाले असतांनाच आता जबरी लुटीचेही प्रकार समोर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. नाशिकच्या मध्यवर्ती सीबीएस (CBS Bus Area) परिसरात दोनच दिवसांपूर्वी 27 किलो चांदीच्या लुटीची घटना घडली होती, त्यातील आरोपीही अजून फरार आहे आणि हा प्रकार ताजा असतांनाच नागासाधूच्या रूपातील चोरांनी आता पोलिसांना आव्हान दिल. त्यानंतर म्हणजेच 27 ऑगस्टला देखील चोरांची टोळी पकडण्यात आल्याने खळबळ उडाली. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीवर आळा बसणार तरी कधी ? हाच प्रश्न आता उपस्थित होतो आहे.