Nashik Chhagan Bhujbal : भारत सरकारचा (Centra Government) उपक्रम असलेल्या आयआरसीटीसीच्या मागणीप्रमाणे नाशिकमध्ये (Nashik) पर्यटन वाढीसाठी तसेच आगामी कुंभमेळ्याच्या (Nashik Kumbhmela) पार्श्वभूमीवर ‘बजेट हॉटेलसाठी’ नाशिकमध्ये जमीन उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे. छगन भुजबळ यांनी याबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी आणि राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र दिले आहे.


इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम कोर्पोरेशन लि. (आयआरसीटीसी) (IRCTC) ही भारतीय रेल्वेची एक विस्तारित शाखा आहे. भारत सरकारचा उपक्रम असलेली आयआरसीटीसी ही संस्था केटरिंग आणि हॉस्पिटॅलिटी सेवांद्वारे श्रेणी सुधारित करणे, व्यावसायिक बनवणे आणि व्यवस्थापित करणे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देणे आणि बजेट हॉटेल्स, विशेष टूर पॅकेजेस यांचा विकास करण्यासाठी काम करते. हा उपक्रम रेल्वे पर्यटन पोर्टलद्वारे आणि बजेट हॉटेल्स, लक्झरी ट्रेन्स चालवून पर्यटनाला चालना देत आहे. उदा. महाराजा एक्सप्रेस, बुद्धीस्ट सर्किट ट्रेन्स इ. आयआरसीटीसीची नवी दिल्ली, रांची, पुरी आणि कोलकाता येथे बजेट हॉटेल्स आहेत. सध्या लखनौ, खजुराहो आणि केवडिया (गुजरात) येथे हॉटेलचे बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.


नाशिकच्या पर्यटनाला अधिक चालना मिळेल : भुजबळ


छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे की, कॉर्पोरेशनकडून संपूर्ण देशात पीपीपी तत्त्वावर बजेट हॉटेल्स/आलिशान हॉटेल्स जोडून या व्यवसायाचा विस्तार केला जात आहे. त्यादृष्टीने पर्यटनासाठी महत्वाचे शहर असलेल्या नाशिकमध्ये आयआरसीटीसीकडून बजेट 3 स्टार आणि 4 स्टार हॉटेलच्या विकासासाठी 100-125 खोल्यांसाठी योग्य जमीन उपलब्ध करण्याचे प्रयत्न आहे. संचालक (वित्त) आयआरसीटीसी नवी दिल्ली यांनी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांना 9 डिसेंबर 2022 रोजी नाशिक शहरात बजेट हॉटेलसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची पत्राद्वारे विनंती केली आहे. नाशिकचे पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच आगामी कुंभमेळा लक्षात घेता, आयआरसीटीसीला नाशिकमध्ये बजेट हॉटेल्स तयार करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून नाशिकच्या पर्यटनाला अधिक चालना मिळणार असून नाशिकची पर्यटन क्षमता वाढून अर्थकारणाला देखील अधिक गती मिळणार असल्याचे म्हटले आहे.


त्यादृष्टीने पर्यटनासाठी अतिशय महत्वाचे शहर असलेल्या नाशिक शहरात आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना दर्जेदार निवासाच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी आयआरसीटीसी या भारत सरकारच्या उपक्रमास बजेट हॉटेल तयार करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.


कुंभमेळा कधी होणार?


आगामी सिंहस्थ 2006-27 चे नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे. कुंभमेळ्याचा आराखडा तयार करण्याच्या कामास प्रारंभ करण्यात येत आहे. त्या दृष्टीनेच आज कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आला आल्या. सिंहस्थ ध्वजारोहण सुरवात 31 ऑक्टोबर 26 रोजी, प्रथम शाही स्नान आषाढ 2 ऑगस्ट 27, द्वितीय शाही स्नान 31 ऑगस्ट 27, तृतीय शाही स्नान 12 सप्टेंबर 27, सिंहस्थ समाप्ती 28 सप्टेंबर 28 अशी कार्यक्रम प्रक्रिया असणार आहे. 


Nashik News : ठरलं! त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी तारखा जाहीर, 'या' दिवशी पहिलं शाही स्नान