नाशिक : बहुप्रतीक्षेत असलेल्या ई- शिवाई बसेस (E Shivai Buses) अखेर नाशिकला दाखल झाल्या आहेत. मात्र व्होल्टेजमुळे चार्जिंग टेस्टिंगमध्ये (Charging Testing) अडचणी येत असल्याने नाशिककरांना या बसमधून प्रवास करण्यासाठी आणखी एखादा दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 15 ऑगस्टपर्यंत नाशिक ते पुणे (Nashik To Pune) ई शिवाई बस धावण्याची शक्यता असून नाशिककरांची इलेक्ट्रिक बसची हौस लवकरच भागणार आहे. 


राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) लालपरीची जागा आता नव्या निम आराम, एसी बसेसनी घेण्यास सुरुवात केली आहे. महामंडळाच्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. नाशिक विभागात नुकत्याच सहा नव्या इलेक्ट्रिक ई-शिवाई बस (E Shivai Bus) दाखल झाल्या असून नाशिक-पुणे मार्गावर या बस धावणार आहेत. संपूर्णपणे इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या शिवाई बसेस गेल्या मे महिन्यात राज्यात सुरू झाल्यानंतर नाशिकला ही बस कधी मिळेल, याची नाशिकरांना प्रतीक्षा होती. त्यानुसार नाशिकला (Nashik) इलेक्ट्रॉनिक्स चार्जिग स्टेशन उभारण्यातही आले आहे. मात्र ई-बसेस मिळाल्या नसल्याने चार्जिंग स्टेशनचा कोणताही वापर होऊ शकला नव्हता. बुधवारी नाशिकला दोन ई-शिवाई दाखल झाल्या तर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी आणखी चार शिवाई बसेस दाखल झाल्या. 


दरम्यान संपूर्णपणे इलेक्ट्रॉनिक्स असलेल्या या बसेस नाशिक-पुणे मार्गावर (Nashik Pune Highway) धावणार आहेत. यासाठी नाशिक आगारात चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून पहिल्याच दिवशी व्होल्टेजच्या मर्यादा आल्याने नाशिकरांचे वेटिंग वाढले आहे. गुरुवारी या बसेसची चार्जिंग टेस्टिंग घेण्यात आली मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे बस सुरू करण्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली. सायंकाळपर्यंत चार्जिंगचे काम सुरु होते मात्र तोवर एक एकच बस चार्जिग झाल्याने दुसऱ्या बससाठी महामंडळाला प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे बसेस सुरू करण्याबाबतची कोणतीही घोषणा या बसेसची ऑनरोड चाचणी आता शुक्रवारी केली गेली. त्यासाठी महामंडळाचे अधिकारी आणि टेक्निकल टिम हे रूट विश्लेषण करणार आहेत. ई- शिवाई बसेस नाशिकला उपलब्ध झाल्या आहेत. या बसेसची चार्जिंग टेस्टिंग सुरू झाली असून प्रवाशांना रस्त्यात कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी सर्व चाचण्या झाल्यानंतरच बस सुरू करणे संयुक्तिक ठरणार असल्याचे विभागीय वाहतूक नियंत्रक किरण भोसले यांनी सांगितले. 


काय आहेत अत्याधुनिक सुविधा



नाशिक ठक्कर बाजार, नाशिकरोड, चाकण, पुणे अशी धावणार आहे. या बसमध्ये ऑन- बोर्ड युनिट आणि बस -ड्रायव्हर कन्सोल (OBU आणि BDC), AIS-140 प्रमाणित वाहन ट्रॅकिंग प्रणाली, आयपी अनाॅलॉग कॅमेरा आधारित पाळत ठेवणे प्रणाली, प्रवाशांसाठी पॅनिक बटण, प्रवासी घोषणा प्रणाली आणि Android TV,  प्रगत ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम (ADAS) आणि ड्रायव्हर स्टेटस मॉनिटरिंग सिस्टम, डिस्प्ले बोर्ड, हवा गुणवत्ता फिल्टर, ड्रायव्हर केबिनमध्ये तापमान, आर्द्रता आणि हवा गुणवत्ता सेन्सर रिअल- टाइम कनेक्ट केलेले अल्कोहोल सेन्सर, सन्स्पेन्शन सेन्सर लोड, प्रत्येक प्रवासी आसनासाठी लोड सेन्सर (प्रवासी मोजणी), टायर प्रेशर मॉनिटरिंग सेन्सर, 2 जागांच्या गटासाठी यूएसबी स्वतंत्र चार्जर, वाहन आरोग्य देखरेख उपकरण, इन्फोटेनमेंट सिस्टम, F&B ट्रॉली आणि ट्रे. 


काय आहेत तिकीट दर 


प्रवास भाडे- फुल तिकीट 475 रुपये प्रति प्रवाशी तसेच अर्धे तिकीट 255 रुपये इतके राहील. तर महिला सन्मान,ज्येष्ठ नागरिक, इत्यादी सर्व योजना लागू राहतील. 


इतर महत्वाची बातमी :