Nashik Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) नाशिकमध्ये (Nashik) येणार असून त्याच दिवशी शिवसैनिक (Shivsena) शहर पोलीस आयुक्तालयावर (Nashik Police) मोर्चा काढण्याची तयारीत आहेत. मात्र तत्पूर्वीच नाशिक शहरात मनाई आदेश लागू झाल्याने शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळच्या सुमारास शिवसेनेचे शिष्टमंडळ नाशिक पोलिसात आयुक्तालयात भेटीला गेले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 30 जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर असून त्या दिवशी शिवसैनिक शहर पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचे तयारीत आहेत यामुळे शहरासह जिल्ह्यात शिवसेना आणि शिंदे गट समर्थकांची प्रशांत पाहायला मिळण्याची शक्यता आहे शहरात शिवसेना पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावरील हल्ल्याचे संशोध अध्यापक पोलिसांना मिळायला नसून यामुळे मोर्चा निघणार आहे मात्र तत्पूर्वी शहरात लागू झाले आहेत शिवाय शिवसेने मोर्चा बाबत कोणते अर्ज दिला नसल्याचे स्पष्टीकरण आयुक्तालयाने दिल्याने मोर्चा नियमात अडकण्याची शक्यता आहे.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज सकाळी शिवसेनेचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तालय भेटीला गेले आहेत. त्यामुळे आता पोलीस आयुक्त काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काल सायंकाळी नाशिक आयुक्तालयाने शहरात मनाई आदेश लागू केले आहेत. पुढील पंधरा दिवस हे मनाई आदेश लागू राहणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. 30 जुलै रोजी ते नाशकात असल्याने त्याच दिवशी शिवसेनेचा पोलीस आयुक्त कार्यालयावर नियोजित मोर्चा आहे. मात्र मनाई आदेश लागू झाल्याने पुढील पंधरा दिवसांसाठी मोर्चे निदर्शने करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
तर शिवसेनेने याबाबत पोलिसांकडे कोणताही अर्ज केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे हा मोर्चा नियमांत अडकण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शिष्टमंडळ जाब विचारण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन बसले आहेत. यावर पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शिवसेनेचा मोर्चा
दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या शहरातील एमजी रोड परिसरात प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणातील मारकेरी अद्यापही मोकाट आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी यासाठी शिवसेनेचा मोर्चा आहे. मात्र तत्पूर्वी मनाई आदेश लागू झाल्याने पोलीस सूट देतात की मोर्चा नियमांत अडकणार हे लवकरच कळेल.