Nashik Sanjay Raut : आम्ही आमचा पक्ष, उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) आमचे नेते आहेत, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आमचे प्रेरणास्थान आहेत, ते सदैव राहील. आमच्यासोबत बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. जी मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे, त्या पक्षामागे संपूर्ण शिवसेना आहे. त्यामुळे हमला करो, गोली मारो, फिर भी हम शिवसेना मे रहेंगे, असा निर्धार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. 


संजय राऊत हे नाशिकमध्ये (Nashik) असून आज ठाणे पोलीस पथकाकडून जबाब नोंदवण्यात आला. जवळपास तासाभरानंतर जबाब नोंदणी झाल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ठाणे पोलिसांचे (Thane Police) पथक जबाब नोंदवण्यासाठी आले होते. यावर संजय राऊत म्हणाले की, माझ्या बाजूने हा विषय संपलेला आहे. काल एक प्रसंग, माहिती, घटना कानावर आल्यानंतर ती संबंधित प्रशासन आणि अधिकाऱ्यांना कळवली. आता त्यांचं काम ते करतील. माझ्याकडचा विषय संपला असल्याचे राऊत म्हणाले.


तसेच राऊत पुढे म्हणाले कि, काल पाठवलेले पत्र माहितीकरिता असून या विषयावर बोलायचं नाही, अशा गुंडांवर मी बोलत नाही, ते पोलिसांचे काम आहे. गुंड, जन्मठेप, खंडणीचे आरोप असलेले लोक, ज्यांचे फोटो मुख्यमंत्र्यांबरोबर पाहतो. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांबरोबर गळाभेट करताना त्यांचे फोटो आहेत. जामिनावर सुटलेले हे तेच गुंड, जेव्हा लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल होतात. हिम्मत कशी होते. अशा गुंडाचे संबंध मुख्यमंत्र्यांबरोबर आहेत, त्यांच्या चिरंजीवांबरोबर आहेत. शिवाय या आधी मी मुख्यमंत्री यांच्याबद्दल अपशब्द वापरला नाही. अमित शाह यांनी आमच्या नेत्यावर अपशब्द वापरला, त्यामुळे त्याच भाषेत उत्तर दिले. मात्र त्यावर बोलणार नाही, तो न्यायालय मॅटर असल्याचे संजय राऊत म्हणाले. 


त्याचबरोबर शिंदे गटाची कार्यकारिणीची बैठक पार पडली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. यावर राऊत म्हणाले की शिंदे गट किंवा मिंधे गट आता वेगळे झालेले आहेत. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर विशेष मेहरबानी केली आहे. त्यांचे ते पाहतील. त्यांच्या कार्यकारणीच आम्हाला काय पडलय. आम्ही आमचा पक्ष, उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत, बाळासाहेब ठाकरे आमचे प्रेरणास्थान आहेत, ते सदैव राहील. बाळासाहेब ठाकरे का गद्दारांना आशीर्वाद देतात का? असा सवाल यावेळी संजय राऊत आणि उपस्थित केला. नारायण राणेही सांगत होते, मला बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. जी मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे, त्या पक्षामागे संपूर्ण शिवसेना आहे, बाकी हा सगळा औट घटकेचा खेळ असल्याचे राऊत म्हणाले. 


मनसेला टोला 


दरम्यान संजय राऊत यांच्या निषेचा ठराव करण्यात आला. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की चांगली गोष्ट असून मी त्यांचा कडवट विरोधक आहे. मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे, असेही ते म्हणाले. दुसरीकडे राऊतांच्या पत्रानंतर मनसेचे संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना डिवचले होते. यावर संजय राऊतांना प्रश्न विचारलं असता ते म्हणाले कि, कोण देशपांडे? आहे का कोणी आणि असा पक्ष अस्तित्वात आहे का? असा टोला त्यांनी यावेळी लगावला.