Sanjay Raut : सत्तांतराला कारण एकच आहे शिवसेना (Shivsena), भाजप (BJP) पक्षाला शिवसेना पक्ष फोडायचा नाही तर संपवायचा आहे, हेच भाजपचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला आहे. शिवाय शिवसेना फोडण्यासाठी त्यांना शिवसैनिकच हवेत असा घाणघातही त्यांनी यावेळी केला.
संजय राऊत नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली. हीच गळती भरून काढण्यासाठी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले नाशिक हे शिवसेनेचे महत्वाचं केंद्र आहे. शिवाय प्रत्येकवेळी नाशिक बाळासाहेबांच्या पाठीशी उभं राहिले आहे. तिकडे काय चाललंय, याकडे नाशिककरांनी लक्ष देऊ नये,नाशिक, नांदगाव, मालेगाव मधील प्रत्येक शिवसैनिक आज शिवसेनेच्या पाठीशी उभा आहे. तर नाशिकचे सगळे नगरसेवक माझ्या सोबत आहेत, त्यामुळे नाशिकपासून हि सुरवात करतो आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
तसेच नाशिकचं सांगाल तर शिवसेना जागच्या जागी आहे, शिवसेनेने तसे शिवसैनिक घडविले आहेत. जनता वाट पाहते आहे, त्यामुळे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचणार आहोत. आम्ही शिवसेनेसाठी काय केलं, काय करतोय हे महाराष्ट्र जाणतोच, राष्ट्रवादी निधी देत नाही, मुख्यमंत्री भेटत नाही, अशी करणे दिलीत, मात्र सत्तांतराला कारण एकच आहे ते म्हणजे शिवसेना, भाजप पक्षाला शिवसेना पक्ष फोडायचा नाही तर संपवायचा आहे, हेच भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
तसेच राज्यात सत्तांतर झालं खरे मात्र हिंदुत्वादी म्हणवून घेणाऱ्या ४० जणांनी भूमिका स्पष्ट करावी, बंडखोर आमदारांनी स्वतःच अस्तित्व निर्माण करा, महाराष्ट्राची जनता जागरूक आहे, चाणाक्ष आहे, जे घडलाय महाराष्ट्रात ते जाणून आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, शिवाय जे आमदार गेलेत, त्यांचे चिरंजीव युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, मग आता काय करणार. सध्या उपस्थित झालेला चिन्हाच्या प्रश्नांवर ते म्हणाले धनुष्यबाण शिवसेनेकडेच राहणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत दुपारी बोलणार आहेत, आज शिवसैनिकांना बरे दिवस आलेत, कारण मुख्यमंत्री शिवसैनिक, विधानसभा अध्यक्ष शिवसैनिक. यावरून असं लक्षात येते कि, शिवसेना फोडण्यासाठी त्यांना शिवसैनिकच हवेत असा घाणाघातही त्यांनी यावेळी भाजपवर केला.
नगरसेवकांच्या प्रवेशावर म्हणाले...
मुंबई असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल कल्याण डोंबिवली असेल तिथे प्रशासक नेमलेले आहेत. आता तिथे कोणीही नगरसेवक नाही. नगरसेवक गेले ते चुकीचं आहे, त्यांना परत आता निवडून यावे लागेल, या तिन्ही भागात शिवसेनेचेच नगरसेवक निवडून येतील, हे कदाचित माजी नगरसेवक असतील, कारण तिन्ही महानगरपालिकेची मुदत संपल्यामुळे सध्या तिथे प्रशासक आहेत, मग नगरसेवक कसे असू शकतात, त्यामुळे चुकीची माहिती देऊ नका, अफवा पसरवू नका, सरकार बदललं असलं तरी अफवांना राजमान्यता मिळालेली नसल्याचे राऊत म्हणाले.
संजय राऊत सकाळच्या ट्विटवर म्हणाले...
आमच्यासाठी संपूर्ण आकाश खुलं आहे, आम्ही आता नव्याने उभारी घेऊ, आता वाघाची झेप घेऊ त्याने अवघा महाराष्ट्र पकडीत येईल, अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालेले आहे. लोक शिवसेनेच्या मागे आहेत, उद्धव ठाकरे यांच्या मागे आहेत, हे सगळं एका चिडीतून उभं राहील आहे, भावना तर आहेत, पण चिडीतून. महाराष्ट्रात हे कस घडू शकत, मातोश्रीच्या पाठीत अशाप्रकारे खंजीर खुपसला जाऊ शकतो, बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवा बाबत अशी दगाबाजी कशी होऊ शकते, ज्या मातोश्रीने भरभरून दिल सगळ्यांना त्यांच्याबाबत हा जो प्रकार झाला आहे, तो राज्यातील जनतेला अजिबात आवडलेला नाहीय, हे दिल्लीच कारस्थान आहे. महाराष्ट्राच्या विरुद्ध, महाराष्ट्राची बदनामी करणं, महाराष्ट्राचे तुकडे करणं, मुंबईला आमच्यापासून तोडणं, त्यासाठी शिवसेनेला कमजोर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.