Nashik NMC Election : नाशिक (Nashik) महापालिका निवडणुकांचे वेध लागले असले तरी मात्र निवडणुका कधी होतील हे सांगता येणे शक्य नाही. मात्र मनपा प्रशासन निवडणुका (Nashik NMC Election) संदर्भातील कामी वेगाने करीत आहे. नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती मागविण्यात आल्या. त्यानंतर आता या या हरकतींचा निपटारा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार अंतिम मतदार यादी 09 जुलै ऐवजी 16 रोजी प्रसिद्ध होणार आहे. तत्पूर्वी झालेल्या बैठकीत निवडणुकांसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे. यानुसार नाशिक महापालिकेतील एकूण 44 प्रभाग करिता सुमारे 11 उपजिल्हाधिकारी दर्जाचे निवडणूक निर्णय अधिकारी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 


सध्या मतदार यादी (Voter List) वरील हरकतींचा निपटारा करण्याचे काम सुरू आहे  तर निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना आदेश देऊन मुंबई (Mumbai) व्यतिरिक्त इतर ठिकाणी चार ते पाच प्रभागांकरिता एक निर्णय अधिकारी याप्रमाणे उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले आहे.


राज्य निवडणूक आयोगाचे सचिव कीरण कुरुंदकर यांनी विशेष आदेश देत याबाबत राज्यातील सर्व महापालिका आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सूचनांची यादी रवाना केली आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी करिता दहा ते पंधरा प्रभागांकरिता एक याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी राहणार आहे. तसेच राज्यातील इतर महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकी करिता चार ते पाच प्रभागांकरिता एक याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी राहणार आहे. 


नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महापालिका आयुक्त हे उपजिल्हाधिकारी पदाच्या दर्जा पेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करणार आहे. त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी त्या जिल्ह्याच्या स्थानिक रहिवासी नसावा तसेच तो अधिकारी मागील तीन वर्षापासून एकाच पदावर कार्यरत नसावा व तो संबंधित जिल्ह्यातील मागील चार वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून नियुक्त नसावा, असे आदेश देण्यात आले आहे.


आचारसंहिता कक्ष
नाशिक महापालिका आयुक्त निवडणूक आचारसंहितेची संबंधित सर्व कामकाज हाताळण्यासाठी आचारसंहिता पक्ष स्थापन करतील, असे आदेशात म्हटले आहे  तसेच कक्षाच्या प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी संवर्गातील एक अधिकारी नियुक्ती करतील. तसेच उमेदवारांचा निवडणूक खर्चाचा हिशोब तपासण्यात एक कक्ष तयार करण्याच्या सूचना देखील देण्यात आले आहेत.