Nashik Keshav Upadhye : दर चारवर्षी आम्ही ऐकतोय की शरद पवार (Sharad Pawar) पंतप्रधान होतील. कधी झाले, आम्ही पाहिले नाही. आपण जसे लहान मुलाला म्हणतो, 'चिनू उभा राहिला, कुणी नाही पहिला..' तशी पवारांची गंमत आहे. त्यांना कधी दोन अंकी खासदार निवडून आणता आले नाही, असा टोला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादीला (NCP) लगावला आहे.
आज नाशिक भाजपच्या (BJP Nashik) वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) बोलत होते. ते यावेळी म्हणाले की, आम्ही हरलो तरी ईव्हीएमला दोष देत नाही. 2024 साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात प्रचंड बहुमतात सरकार येईल. राज्याची आणि केंद्राची निवडणूक यात फरक असते. कर्नाटकमधील (Karnataka) पराभवाची कारणीमीमांसा केली जाईल. 2018 साली देखील काही राज्यांमध्ये पराभव झाला होता. मात्र 2019 साली प्रचंड बहुमतात विजय झाल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले कि, शासन व्यवस्थेला सुशासन पद्धतीत बदलण्याचे काम या नऊ वर्षात झाले. जवळपास 800 योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मान उंचावली. सबका साथ, सबका विकास फक्त भारत पुरते मर्यादित राहिले नाही. कोरोना काळात जागतिक स्तरावर नेतृत्व मान्य करण्यात आले. 80 कोटी लोकांना अन्नधान्य देण्यात आले. भ्रष्टाचार मुक्त शासन या देशातील जनता अनुभवत आहे. देशातील सर्वसामान्य नागरिकाच्या जीवनात परिणाम करणारे, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान उंचावणे, असे नऊ वर्षाचे वर्णन करता येईल. नऊ वर्षाच्या निमित्ताने आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रतिसाद देखील मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एकही दंगल झाली नाही...
दरम्यान जयंत पाटील यांनी दंगलीच्या संदर्भात दिलेल्या पत्रावर ते म्हणाले की, दंगलीच्या जीवावर कुणी पोळ्या भाजल्या, याचा इतिहास जयंत पाटील यांनी बघावा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पाच वर्षांत एकही दंगल झाली. सत्ता गेल्यामुळे तडफड सुरू आहे. तर सद्यस्थितीत राज्यातील अनेक भागात मोर्चे सुरु आहेत, यावर उपाध्ये म्हणाले की, सरकारकडे विश्वास वाटत असल्याने लोक संघटित होत असतील तर स्वागत करायला हवे. पत्रकार परिषद लोक संवादाचे महत्त्वाचे साधन आहे. पण 'जन की बात' माध्यमातून नरेंद्र मोदी लोकांशी संवाद साधत आहे. तसेच पवार पंतप्रधान झाले असते तर या प्रश्नावर ते म्हणाले की, दर चार वर्षी आम्ही ऐकतोय की पवार प्रधानमंत्री होतील. पण कधी झाले, अन् आम्ही पाहिले नाही. आपण जसे लहान मुलाला म्हणतो, 'चिनू उभा राहिला, कुणी नाही पहिला..' तशी पवारांची गंमत आहे. त्यांना कधी दोन अंकी खासदार निवडून आणता आले नाही.
अनेक मुद्दयांवर भाष्य
त्याचबरोबर उज्ज्वला गॅस योजने संदर्भात ते म्हणाले की, व्यक्तीसापेक्ष पद्धतीने नागरिक म्हणू शकता की, योजनेचा लाभ मिळू शकला नाही. मात्र अधिकृत लाभार्थ्यांची यादी मिळू शकते. कालच बातमी आली की, महागाईचा निर्देशांक नीचांक स्तरावर आली आहे. तर आता तेलंगणा सरकार कांदा खरेदी करणार असल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले कि, कांद्याबाबत ज्यावेळी ज्यावेळी प्रश्न निर्माण झाला, त्यावेळी सरकारने संवेदनशीलतेने मार्ग काढला आहे. व्यापाराच्या काही गोष्ट त्यात आहे. तेलंगणामध्ये कांदा पिकत नाही, त्यामुळे भाव मिळणे शक्य आहे. तसेच ब्रिजभूषण सिंह प्रकरणावर ते म्हणाले कि, महिला खेळाडूंचे म्हणणे पोलिसांनी एकूण घेतले आहे. पुढे कार्यवाही होईल, असे ते म्हणाले. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेत नोटा पोहचायच्या आधीच गायब झाल्याचा मुद्दयांवर ते म्हणाले कि, आरोप होत असतात..