Nashik Airport : नाशिक (Nashik) विमानतळावरून सध्या एकच सेवा सुरु असल्याने अन्य एअर कंपन्यांच्या (Air Company) सेवा बंद असल्याने विमानसेवा विस्कळीत झाली आहे. तर दुसरीकडे नुकताच या विमानतळाच्या (air Service) दुरुस्तीसाठी पंधरा दिवस बंद ठेवण्यात आले होते. आता विमानतळाने एअर कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी नाईट लँडिंगची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नाशिक विमानतळावरून (Nashik airport) उड्डाण घेणाऱ्या अनेक कंपन्यांनी अंगार घेत काढता पाय घेतला. त्यामुळे अनेक विमानसेवा बंद झाल्या. परिणामी प्रवाशांची संख्या घातल्याने व्यवसायावर परिणाम झाला. त्यानंतर विमानतळाने दुरुस्तीचे काम हाती घेऊन पंधरा दिवस विमानसेवा बंद ठेवली. त्यानंतर नवी धावपट्टी उभारण्याचा निर्णयही घेतला. आता विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना नाशिककडे आकर्षित करण्यासाठी एअरोनॉटिकल तसेच नॉन-एरोनॉटिकल शुल्कात एचएएलने मोठी सवलत जाहीर केली असून, ऑपरेशनच्या सुरुवातीच्या काळात रात्री मोफत पार्किंगची सवलत दिली आहे. त्यामुळे नजिकच्या काळात नाईट लँडींग सेवा पुरवली जाणार आहे.
दरम्यान नाशिक विमानतळ हे राज्यभरात महत्वपूर्ण मानले जाते. नाशिकमध्ये अनेक व्यवसाय, कंपन्या, शेतीमाल आदींची भरभराट आहे. त्यामुळे नाशिक विमानतळाकडे नाइट लॅडींगचा पर्याय म्हणून सुरुवातीपासूनच पाहिले जात आहे. याचा पार्श्वभूमीवर ओझर एचएएलने महत्वाचा निर्णय घेतला आहे. नाशिक विमानतळ वर्षातील सर्व दिवस सकाळी ८ रात्री १० वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. शिवाय प्रवाशी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने, एअर कंपन्यांना अधिकाधिक समावेश व्हावा या नियोजनातून नवीन समांतर धावपट्टी उभारण्याचे नियाेजन असून अतिरिक्त टॅक्सी वे लिंकसह विमान पार्किंगसाठीच्या सध्याच्या सुविधांचा विस्तार केला जाणार आहे. विमानतळ सुरक्षा वाढवण्यासाठी टर्मिनल बिल्डिंग, एटीसी, रनवे आणि पार्किंग ऍप्रन इत्यादींचा समावेश असलेल्या संपूर्ण एरोड्रोम परिसरात सर्व सीसीटीव्ही कॅमेरे अत्याधुनिक तंत्रज्ञान डिजिटल सिस्टीमसह बदलण्याची एचएएलद्वारे योजना तयार करण्यात येत आहे.
दरम्यान विमानतळाची सुरक्षा वाढवण्यासाठी टर्मिनल बिल्डिंग, एटीसी, रनवे आणि पार्किंग यांसह एरोड्म परिसरात सर्व सीसीटीव्ही कॅमेरे अत्याधुनिक तंत्रज्ञान डिजिटल सिस्टिमसह बदलण्यात येणार असल्याचे एचएएल प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच विमान कंपन्या या विमानतळाचा वापर नाइट लँडिंगसाठी आणि वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी देखील करू शकतात, असे एचएएलने स्पष्ट केले आहे. यामुळे नाशिकमधून आणखी काही प्रमुख शहरांना विमानसेवा मिळण्याच्या आशा बळावल्या आहेत. शिवाय नुकतेच धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम करण्यात आल्याने आता काेणत्याही प्रकारची विमाने उतरू शकतील इतकी तिची क्षमता असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.
नाशिक विमानतळावर अनेक सुविधा
दरम्यान नाशिक विमानतळावर नुकताच धावपट्टी दुरुस्त करण्यात आली असून आगामी काळात दुसरी नवीन समांतर धावपट्टी उभारण्याचे नियोजित आहे. त्याचबरोबर अतिरिक्त टॅक्सी वे लिंकसह विमान पार्किंगसाठी सध्याच्या नागरी ऍप्रनचा विस्तार प्रस्तावित आहे. तसेच नागरी उड्डाणाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी विमानतळ परिसरात बीपीसीएल कंपनी इंधन भरण्याचे स्टेशन स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. शिवाय एखादे विमान थांबा घेण्यासाठी आल्यानंतर त्यांच्या यंत्रणांची तपासणी व दूरूस्तीसाठीचे एमआरओ यंत्रणा विमानतळावर उपलब्ध आहे.