Nashik Saptshrungi Gad : साडेतीन शक्ती पीठांपैकी अर्धे पीठ असणाऱ्या सप्तशृंगी देवी (Saptshrungi Devi) मूर्तीच्या संवर्धनावरून नवा वाद निर्माण झाला असून पंढरपूर (Pandharpur) आणि कोल्हापूरला (Kolhapur) जे झालं, ते सप्तशृंगी देवीबाबत होऊ देणार नाही असा इशारा अखिल भारतीय किन्नर आखाड्याचे श्री महंत ऋषिकेश नंदगिरी यांनी दिला आहे.  शिवाय देवस्थान ट्रस्टने (Saptshurngi Devi Trust) मनमानी केल्यास गडाच्या पहिल्या पायरीवर आत्मदहन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. 


सप्तशृंगी माता मंदिर मूर्ति संवर्धन देखपाल करण्यासाठी 45 दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय सप्तशृंगी निवासिनी तर्फे घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय आता वादाच्या भोवऱ्यात  सापडला आहे. अचानक देवीच्या मूर्ती संवर्धन ची गरज का भासली कोणाच्या सांगण्यावरून हे काम करण्यात येत आहे, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे मंत्र ऋषिकेश नंदगिरी महाराज व त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. दरम्यान आम्हाला विश्वासात न घेता काम सुरू केल्यास आम्ही आत्मदहन करून घेऊ असा इशारा देखील यावेळी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे महंत ऋषिकेश नंदगिरी महाराजांनी दिला आहे. 


काही दिवसांपूर्वी सप्तशृंगी मंदिरावरील मार्गावर पुराच्या पाण्यामुळे प्रदक्षिणामार्गाचे नुकसान झाले होते तर काही भाविक देखील जखमी झाले होते. त्यानंतर सप्तशृंगी गडावरील मूर्ति देखभाल कामासाठी 21 जुलै ते 5 सप्टेंबर या 45 दिवसांच्या कालावधीत या मंदिराची डागडुजी करण्यात येणार होती. त्यासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार होते. परंतु आता हे कामकाज सुरू व्हायच्या आधीच वादात सापडले आहे. महंत ऋषिकेश नंदगिरी महाराज व त्र्यंबकेश्वर मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टवर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत सप्तशृंगी देवी संस्थांवर आक्षेप घेत संबंधित कामावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 


हे प्रश्न केले उपस्थित 
देवीच्या मूर्तीची संवर्धन करण्याची गरज का भासली कुणाच्या सांगण्यावरून हे काम करण्यात येत आहे. याची देखील माहिती अद्याप उपलब्ध नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित करत त्यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाची गरज असेल, तर कोणत्या भागाला संवर्धनाची गरज हे आधी स्पष्ट करा, मूर्ती संवर्धन करण्याआधी तज्ञ समितीकडून अभ्यास करा, मूर्ती संवर्धनाचे काम खासगी संस्थेला का? संवर्धना दरम्यान मूर्तीला काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? तसेच मंदिरात नेमके कोणते काम केले जाणार आहे. याबाबतची माहिती मिळावी हे काम करताना मूळ मूर्तीला धक्का लागणार नाही, याची हमी आम्हाला देण्यात यावी असे मागणी त्यांनी यावेळी केले आहेत तर सप्तशृंगी मंदिरातील मूर्तीला इजा झाली असावी म्हणूनच कोणालाही विश्वासात न घेता मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असावा असा संशय त्रंबकेश्वर मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी व्यक्त केला त्यामुळे मूर्ती संवर्धनाचे काम सुरू होण्यापूर्वीच वादात सापडले आहे. 


धर्मसभेला विचारलं का? 
दरम्यान सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टला स्वयंभू मूर्ती संवर्धनाआधी धर्मसभेला विचारलं का? असा सवाल महंत ऋषिकेश नंदगिरी यांनि उपस्थित केला आहे. तसेच देवी मूर्तीला इजा झाली असून मूर्ती संवर्धनाच्या नावाखाली देवी मूर्ती आणि डोळ्यात बदल केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. मूर्ती संवर्धनाचे काम खासगी संस्थेला का? संवर्धना दरम्यान मूर्तीला काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे देवस्थान ट्रस्टची मनमानी थांबवा, राज्य सरकारने यात हस्तक्षेप करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.