Nashik CA Results : नुकत्याच लागलेल्या सीएच्या परीक्षेत 9CA Exam Results) नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) 20 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत बाजी मारली असून साहिल समदानी (sahil Samdani) याने देशात 15 वा क्रमांक मिळवला नाशिकच्या शिरपेचात मानाचा  तुरा खोवला आहे. तर मालेगाव (Malegaon) येथील सायकल दुकानदाराची मुलगी निकिता अग्रवाल हिने 16 ते 17 तास अभ्यास करून यश संपादन केले आहे. 


इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. मुंबईच्या मित शाहने ऑल इंडिया फर्स्ट रॅंक मिळविला आहे. जयपूरच्या अक्षत गोयलने ऑल इंडिया दुसरा रॅंक मिळविला आहे. तर सुरतच्या सृष्टी संघवी ही तिसऱ्या स्थानी आहे. यात नाशिक जिल्ह्याने देखील घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातून 198 विद्यार्थ्यांनी परीक्षेत बाजी मारली असून यामध्ये नऊ विद्यार्थिनीचा समावेश आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया तर्फे 14 ते 30 मे दरम्यान घेण्यात आलेल्या सीएच्या अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षेत नाशिकचे विद्यार्थी चमकले आहेत. नाशिक मधून साहिल समदांनी याने राष्ट्रीय क्रमवारीत 15 व्या स्थानावर यश संपादन करीत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मकरंद जैन यांनी 46 स्थानावर झेप घेतली आहे. चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या निकालात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी दैनंदिन संपादन केले आहे 


दरम्यान नाशिकमधून पल्लवी सक्ते, ओमकार कातकडे, प्रशांत कोष्टी, धुम्रिल शेरे, ऋतुजा शुक्ल, पार्थ भराडीया, अर्चित शाह, कीर्तीका घोडेकर, पार्श्व दुग्गड, प्रगती जैन, प्रज्ञा डागा, निल शाह, भरत तुलसीयान, जिनेश लोढा, बुरानुद्दीन भागमल, मंजिरी देवरे, भार्गवी देवरे, वेदांग करमकर तर पंचाक्षरी अकॅडमीच्या वेदांगी देशमुख या विद्यार्थ्यांनी सीएच्या अंतिम परीक्षेत यश संपादन केले आहे. तर मालेगाव येथून निकिता अग्रवाल, यश बागमार आणि विनय विनोद पहाडे हे तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर सिन्नर तालुक्यातील वावी गावचे सुपुत्र सर्वे संतोष मालपाणी याने चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाला असून सर्वेशने 496 गुण मिळवले 


सायकल दुकानदाराची मुलगी सीए 
मालेगाव येथील निकिता अग्रवालने सीए परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. निकिताचे वडील पियुष अग्रवाल यांचे मालेगाव शहरातील जुन्या बस स्थानकमार्गावर सायकलचे दुकान आहे. निकिताने पुणे येथे क्लासेस लावून ऑनलाइन अभ्यासाला केल्याचे सांगितले. सुमारे 16 ते 17 तास तिने अभ्यास केला आदिनाथ शाळेतून दहावी 93 टक्के तर मजगाव महाविद्यालयात बारावीला 87 टक्के मार्क्स मिळाले होते. निकितास गणिताची आवड असल्याने कॉमर्सला प्रवेश घेतला आणि सीए होण्याची स्वप्न पूर्ण केल्याचे तिने सांगितले. 


साहिल समदानी देशात पंधरावा 
चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया तर्फे 14 ते 30 मे दरम्यान घेण्यात आलेल्या सीएच्या अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षेत नाशिकचे विद्यार्थी चमकले आहेत. नाशिक मधून साहिल समदांनी याने राष्ट्रीय क्रमवारीत 15 व्या स्थानावर यश संपादन करीत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.