Nashik Crime : गल्लोगल्लीत जाऊन कोयता घेऊन दहशत माजवणे, वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणे, या घटना नाशिक (Nashik) शहरात सतत घडत आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. वाढती गुन्हेगारी बघता पुणे आणि नाशिकमध्ये गुन्हेगारांची धिंड काढली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र ही धिंड काढून पोलिसांना नक्की काय साध्य करायचं आहे? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. 


पुणे आणि नाशिक (Pune Crime) शहर सध्या गुन्हेगारांचा अड्डा बनलय का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. वाहन तोडफोड, प्राणघातक हल्ले, लूटमार, चोऱ्या असे प्रकार इथे नित्याचेच झाले आहेत. गुन्हेगारीवर (Nashik crime) आळा कधी बसणार? असा प्रश्न उपस्थित केला जात असतांनाच गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांकडून आरोपींना बेड्या ठोकल्या जाऊन त्यांनी जिथे दहशत माजवली तिथे जाऊन त्यांची धिंड काढली जाते आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून तर सर्रासपणे फिल्मीस्टाईल गुन्हेगारांना मिरवले जात आहे. 


गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात देखील गावगुंडांनी हैदोस केला असून शहरातील विविध भागात वाहनांच्या जाळपोळीसह तोडफोड करण्यात येत आहे. या संशयितांना नाशिक पोलिसांनी (Nashik Police) ताब्यात घेतलं असून पुण्याची स्टाईल आता नाशिक पोलिसांकडूनही कॉपी करण्यात आली असून दोन दिवसात नाशिकरोड परिसरात हातात कोयते घेऊन वाहन तोडफोड करणाऱ्या सहा जणांची काल मिरवणूक काढण्यात आली. मात्र ही धिंड काढून पोलीस नक्की काय साध्य करत आहेत, असा सवाल आता सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. 


सामाजिक कार्यकर्ते किरण मोहिते म्हणाले की, धिंड काढून उलट गुन्हेगारांचे मनोबल वाढते आहे, असे प्रकार न करता गुन्हेगारीवर आळा बसविण्यासाठी प्रयत्न करावेत. नाशिकचा विचार केला तर शहरात एक महिन्यातच खून, प्राणघातक हल्ले, वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरलीय आणि गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल असं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केल आहे. दुसरीकडे कुणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करणे, कायद्यातील तरतुदी नूसार पुढील कारवाई करून शांतता कशी कायम राहील, यासाठी प्रयत्न करणे हे पोलिसांचं कामच आहे. मात्र धिंड काढण्याचा हा नविन ट्रेंड कायदेशीर तरी आहे का? हा देखील प्रश्नच आहे.. 


जुलै महिन्यात नाशिकची गुन्हेगारी


7 जुलै शिंगाडा तलाव 2 गटात हाणामारी तलवार कोयत्याने हाणामारी, 9 जुलै ATM मशीन चोरून नेले, सामन गाव नाशिकरोड, 10 जुलै अंबडच्या महाकाली चौकात 2 गटात हाणामारी लाठ्या काठ्या दांडके घेऊन हाणामारी, 12 जुलै सिडको परिसरात 16 गाड्यांची तोडफोड, 16 जुलै उंटवाडी परिसरात  तरुणावर तलवारीने हल्ला, 20 जुलै अंबड परिसरातील इंडियन बँकेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न, योगायोगाने पोलीस पोहचले, दरोडेखोर पसार झाले. 22 जुलै तुषार चावरे तरुणाचा बोधले नगर परिसरात भररस्त्यात वार करून खून,  24 जुलै विहितगाव परिसरात मध्यरात्री हातात कोयते मिरवत तरुणांचा धुडगूस गाड्यांची 18 तोडफोड आणि जाळपोळ झाल्याची स्थानिकांची माहिती, 25 जुलै मध्यरात्री धोंगडे नगर, जगताप मळा परिसरात 6 गाड्यांची तोडफोड. 


 


ईतर संबंधित बातम्या  : 


Nashik Crime : नावात 'अंकुश' असून उपयोग नाही', तर गुन्हेगारीवर 'अंकुश' हवा, नाशिककर पोलिसांवर संतप्त