Nashik Police Bharti : नाशिक पोलीस भरतीची (Nashik Police Bharti) मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर आता उमेदवारांच्या सामाजिक आणि समांतर आरक्षणाबाबत, तसेच त्यांना मैदानी चाचणीत मिळालेल्या गुणांबाबत काही तक्रारी असल्यास नियंत्रण कक्ष, नाशिक, ग्रामीण येथे तक्रार घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 


नाशिक (Nashik) ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची 164 आणि पोलीस शिपाई चालक यांची 15 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर पोलीस शिपाई 18935 तर पोलीस शिपाई चालक या पदांसाठी एकूण 2114 अशा एकूण 21 हजार 49 उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले होते.


नाशिक पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, आडगाव, नाशिक ग्रामीण येथे 02 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. यासाठी एकुण 29 हजार 49 उमेदवारांपैकी 14 हजार 326 उमेदवार भरती प्रक्रियेसाठी उपस्थित होते. उपस्थित उमेदवारांची टक्केवारी 68 टक्के एवढी होती. यातील 12 हजार 266 उमेदवार शारीरिक मोजमापं आणि कागदपत्रं पडताळणीत पात्र ठरल्याने त्यांच्या मैदानी चाचण्या घेण्यात आल्या असून त्या 20 जानेवारी 2023 रोजी पूर्ण झाल्या आहेत.


दरम्यान, उमेदवारांना मैदानी चाचणीत मिळालेले गुण त्या त्या दिवशी नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या संकेतस्थळावर www.nashikruralpolice.gov.in प्रसिध्द करण्यात आले होते. उमेदवारांच्या सामाजिक आणि समांतर आरक्षणाबाबत त्यांना मैदानी चाचणीत मिळालेल्या गुणांबाबत काही तक्रारी असल्यास नियंत्रण कक्ष, नाशिक, ग्रामीण येथे तक्रार घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्यानुसार पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केलेल्या काही उमेदवार यांनी त्यांच्या सामाजिक आणि समांतर आरक्षणाबाबत, इतर विषयांबाबत काही शंका/तक्रारी उपस्थित केल्या होत्या, तसेच काहींनी मार्गदर्शनही मागितले होते. अशा उमेदवारांच्या तक्रारीचे निरसन करण्यात आले असून नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या संकेत स्थळावर www.nashikruralpolice.gov. in प्रसिद्ध करण्यात आले आहे.


पोलीस शिपाई चालक पदासाठी शारीरिक मोजमाप आणि कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक 23 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत कौशल्य चाचणी घेण्यात आलेली आहे. कौशल्य चाचणीमध्ये उत्तीर्ण होवून लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादीदेखील नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या संकेत स्थळावर www.nashikruralpolice.gov.in दिनांक 30 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.


पोलीस शिपाई भरती सन 2021 च्या अनुषंगाने शारीरिक चाचणीमध्ये कमीत कमी 50 टक्के गुण प्राप्त या उमेदवारांमधून प्रवर्गनिहाय 1.10 या प्रमाणानुसार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. राज्यातील सर्व घटकात लेखी परिक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार असल्याने लेखी परिक्षेकरिता पात्र होणाऱ्या उमेदवारांना लेखी परिक्षेचा दिनांक नंतर कळविण्यात येईल. उमेदवारांनी पोलीसांनी यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या माहितीची खातरजमा करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI