Nashik Police : मकर संक्रात (Makar sankrant) सणाच्या पार्श्वभूमीवर पतंगोत्सवासाठी बंदी  असताना नायलॉन मांजाची (Naylon Manja) विक्री करणाऱ्यांच्या विरोधात नाशिक (Nashik) शहर पोलिसांनी जोरदार मोहिम राबविण्यात येत आहे. नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या सहा संशयितांना पोलिसांनी शहरातून तडीपार केले आहे. तर नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या अन्य एकालाही पोलिसांनी अंबड पोलीस ठाणे शाखेतून सापळा रचून अटक करण्यात आले आहे.


नाशिक (Nashik Police) शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नायलॉन मांजा खरेदी विक्री, साठा, वापर करण्याचा मनाई आदेश निर्गमित केला असून अशा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल होताच आरोपींवर तडीपारची कारवाई करण्याचे आदेशही पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. असे असतानाही नाशिक शहरात सर्रास नायलॉन मांजाची विक्री होताना दिसून येत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसात जवळपास दहा ते बारा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरी देखील नायलॉन मांज्याची विक्री ही सुरूच आहे. नाशिक शहरात मकर संक्रातीच्या जोरदार तयारी सुरु असून या पार्श्वभूमीवर शहरभर पतंगोत्सव साजरा केला जातो. मात्र दरवर्षी शहरात नायलॉन माजांची विक्री करण्यात येते. त्यामुळे यंदा देखील नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या संशयितांना पोलीस ताब्यात घेत आहेत. 


अशातच अजिंक्य प्रदीप भिसे, बाळासाहेब खंडेराव राहींज, समाधान राजेंद्र मोरसकर, हेमंत वीरेंद्र गोला, प्रवीण मधुकर मोरे, शुभम संतोष धनवटे यांना पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या नायलॉन मांजा विक्री विरोधी गुन्ह्यात एक जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. सहा संशयितांवर नायलॉन म्हणजे वापर, साठा, विक्री केला म्हणून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सहा जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून पोलीस उपायुतांकडे अंबड पंचवटी पोलिसांनी प्रस्ताव सादर केले होते. उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी त्यांना वीस दिवसांसाठी पोलीस आयुक्तालयातून तडीपार करण्यात आले. तसेच यापुढेही प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीसाठी वापर करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना नाशिक शहर आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार करण्याचा इशारा ही पोलिसांनी दिला आहे.


नायलॉन मांजाचे 85 गट्टू हस्तगत 


नाशिक शहरात नायलॉन मांजा खरेदी विक्री, साठा, वापर करण्यास मनाई आदेश लागू असताना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी हिंदुस्तान नायलॉन मांजा विक्री करणारा संशयित सोहेल खान याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 42 हजार 500 रुपयांचे नायलॉन मांजाचे 85 गट्टू पोलिसांनी हस्तगत केले आहे. गुन्हे शोध पथकातील पोलीस शिपाई प्रवीण राठोड यांना मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस शिपाई योगेश शिरसाठ, मुकेश गांगुर्डे, सचिन करंजे, तुषार देसले, समाधान शिंदे, यांनी यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली