Nana Patole : महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतची (Maharashtra Politics) 12 तारीख 22 करण्यात आली असून डीले जस्टीस ही वाईट प्रक्रिया आहे. तसेच राज्यातील ईडी सरकार (ED Government) हे असंवैधानिक आहे. तारीख पे तारीख हे देशाच्या संविधानाला आधारित नाही. भाजपचे (BJP) मूळ हे महिला नाही, त्यामुळे महिला त्यात कुठे येणार? महाराष्ट्रात मंत्र्यांमध्ये महिला नाही हे दुर्दैवीच आहे. आमचे मित्र एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे चांगले पण त्यांना असर दुसऱ्यांचा लागला आहे. अशी टीका नाना पाटोले (Nana patole) यांनी केली आहे. 


काँग्रेसचे (Congress) नेते नाना पटोले आझादी गौरव पदयात्रेच्या निमित्ताने नाशिकमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि,  काँग्रेस सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी मान्यता दिल्यानंतर आम्ही महाविकास आघाडीत समाविष्ट झालो. तीन पक्ष एकत्र आल्याने महाविकास आघाडी निर्माण झाली. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर आता शिंदे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळावे हिच आमची ईच्छा होती, मात्र तसे होताना दिसत नाही, असा रोषही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 


ते पुढे म्हणाले दोस्तीत सगळ्या गोष्टी एकमेकांना विचारून केल्या पाहिजे. आपल्याच मताने सगळ्या गोष्टी करायच्या तर त्याला दोस्ती नाही म्हणत. ही महाविकास आघाडी विपरीत परिस्थितीत निर्माण झाली होती, महाराष्ट्राच्या हितासाठी सोनिया गांधी यांनी निर्णय घेतला होता. आताच्या ईडी सरकार मध्ये मलईसाठी भांडण चालू आहे. आमच्या सरकार मध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम होता. ज्यावेळी अध्यक्ष पदाच्या राजीनामा देण्यासाठी सगळ्यांना सांगायला गेलो होतो. पण ठिक आहे, त्यांना फॉरमॅलिटी पाळायची नसेल तर ठीक आहे, कोणावर जबरदस्ती नाही. काँग्रेस हा जनतेतला पक्ष आहे, निश्चित पणे काँग्रेस सोबत जनता आहे. आमच्या मित्रांनी प्रामाणिकपणे रहावे आणि विचारविनिमय करावा अशी विनंती त्यांनी यावेळी मित्रपक्षांना केली. 


तसेच खालच्या सभागृहात अजित पवार (Ajit Pawar) आहेत, वरच्या सभागृहात नीलम ताई आहे. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळावे हिच आमची ईच्छा होती. आमच्या खूप कमी जागा आहे, असा विषय नाही. सगळ्यांच्या बरोबर जागा आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नाही, नाहीतर त्यांचेही दहा होते, असेही ते म्हणाले. तर भाजपवर टीका करताना ते म्हणाले कि, भाजप विरोधी बोलले तर कारवाई होते. भाजप वॉशिंग मशिन आहे. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय, वारकरी लोकं खोट बोलत नाही. आपण भाजपच्या विरोधात बोलले तर कारवाई होते. पाठीशी राहिलो तर स्वच्छ होतो. असं सामान्य माणूस देखील बोलत आहे. भाजपला त्याची लाज राहिली नाही. भाजपने नंगा नाच राजकीय व्यवस्थेमध्ये सुरू केलाय. इंग्रज जसं करत होते, तेच चालू आहे, अशी खळबळजनक टीका त्यांनी यावेळी केली. 


ईडी सरकार हे असंवैधानिक
महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतची 12 तारीख 22 करण्यात आली असून डीले जस्टीस ही वाईट प्रक्रिया आहे. तसेच राज्यातील ईडी सरकार हे असंवैधानिक आहे. तारीख पे तारीख हे देशाच्या संविधानाला आधारित नाही ही आमची भूमिका असल्याचे पटोले म्हणाले. भाजपचे मूळ हे महिला नाही, त्यामुळे महिला त्यात कुठे येणार? महाराष्ट्रात मंत्र्यांमध्ये महिला नाही हे दुर्दैवीच आहे. आमचे मित्र एकनाथ शिंदे हे चांगले पण त्यांना असर दुसऱ्यांचा लागला आहे. दम देण्याची भाषा जि त्यांची महाशक्ती दिल्लीत आहे, त्याचा असर असल्याचे ते बोलले. 


आरे कारशेड मेट्रो प्रकल्प 
मुंबईत सगळीकडे प्रदूषण असून बिल्डरांच्या हितासाठी भाजप निर्णय घेत असून मुंबईकरांचा स्वच्छ ऑक्सिजन हिसकवण्याचे पाप ते करत आहेत. भाजपचे जे बिल्डर आहे, त्यावर ते अतिक्रमण करत असून त्यांच्याकडून त्यांना मलई खायची आहे. ईडी सरकारने पहिला निर्णय बुलेट ट्रेनचा घेतला आहे मात्र एकीकडे महाराष्ट्रात पूरस्थिती असतांना त्यांना मदत केली नाही. त्यामुले आगामी अधिवेशनात आमचा पहिला मुद्दा शेतकऱ्यांना मदत का दिली गेली नाही हा असणार आहे. 


राष्ट्रध्वज सदोष 
सध्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने घरोघरी तिरंग्याचे वाटप केले जात आहे. यातील अनेक तिरंगे हे सदोष असल्याचे समोर येत आहे. जे तिरंगे घरोघरी दिले जात आहेत. त्यात अनेक अशोकचक्र मध्यभागी नाही. कारण चिन वरून हे तिरंगे आणले आहेत. केंद्रात सत्तेत आल्यानंतर सगळं चिन वरून आयात होते आहे. चीन वरून झेंडे आणले असल्याने तिरंग्याचा अवमान झाला आहे. परभणीत काल भाजप वाल्याने झेंड्यावर कमळ टाकले होते. आमच्या सन्मानाला ठेच पोहोचवण्याचे काम भाजप करते आहे. तिरंग्याचा अवमान करण्याचा अधिकार भाजपला नाही, असा इशारा यावेळी पटोले यांनी दिला.