Nashik Crime : एकीकडे होळीच्या (Holi) सणाच्या जल्लोष सुरु असताना नाशिक शहरात (Nashik City) भरवस्तीत तरुणाला संपवल्याची घटना घडली आहे. शहरातील दिंडोरी नाका परिसरात ही घटना घडली असून त्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी संशयितांना अटक केली. मात्र गुन्हेगारीचा फास नाशिक शहराला आवळत असल्याचे वारंवार अधोरेखित होत आहे.
नाशिक (Nashik) शहरात दिवसाआड खुनाची (Murder) घटना घडत असून गुन्हेगारी शेवटच्या टोकावर गेली असल्याचे हे चित्र आहे. एकीकडे धार्मिक नगरी म्हणून असलेली ओळख आता गुन्ह्यांच्या घटनांनी पुसू लागली आहे. सर्वत्र होळीचा सण साजरा होत आहे. होळी जळत असताना दुसरीकडे शहरातील पंचवटी (Panchavati) परिसरात दिंडोरी नाक्यावर भरवस्तीत 28 वर्षीय तरुणाला संपवल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच संशयितांचा पाठलाग करण्यात आला. मात्र गर्दीचा फायदा घेत संशयित फरार झाले. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच वाघ्या काही तासांत संशयितांना अटक करण्यात आली आहे.
नाशिक शहरातील दिंडोरी नाका भागात राहणाऱ्या किरण गुंजाळ (Kiran Gunjal) याची भाईगिरीतून सिनेस्टाईल पाठलाग करत धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी सुमारास घडली. किरण गुंजाळ हा गेल्या काही दिवसांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार (Nashik Bajar Samiti) समितीत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता. नवनाथ नगर परिसरात राहणारा किरण गुंजाळ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पेठरोड येथून दुचाकीवरून जात असतांना तीन ते चार संशयितांनी पाठलाग सुरू केला. त्यानंतर गुंजाळ याने त्याची दुचाकी पेठफाटा येथे सोडून दिंडोरी नाक्याकडे पळ काढला. मात्र संशयित मारेकऱ्यांनी त्याला दिंडोरी नाक्यावर गाठत त्याच्या छातीत आणि पोटावरही धारदार शस्त्राने वार केले. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किरण गुंजाळ याच्या गळ्यावर संशयितांनी पुन्हा वार केला. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत गुंजाळ मयत झाला होता.
काही तासांत संशयितांना अटक
दरम्यान खून झाल्यानंतर पंचवटी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या दोन तासांत संशयितांना अटक करण्यात आली असून यात नितीन पांडुरंग साबळे, देवा उत्तम पाटील, दिपक रामान्ना ताब्यात घेतले आहे. किरण गुंजाळ आणि संशयितांमध्ये भाजी मार्केटमध्ये काम करीत असतांना किरकोळ वाद होत होते. सोमवारी सायंकाळी देखील किरकोळ वाद झाला . यात संशयितांनी किरण याच्यावर चाकूने गळ्यावर व पोटात वार करून खून करून पळ काढला.
आठवड्यावर होते बहिणीचे लग्न
मयत किरण गुंजाळ याच्या बहिणीचा येत्या सोमवारी विवाह असून तो सकाळपासून लग्न पत्रिका वाटप करत होता. सोमवारी सायंकाळी तो लग्न पत्रिका वाटप करण्यासाठी जात असतांनाच मारेकऱ्यानी त्याला गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यावेळी वादातून तीन ते चार मारेकऱ्यांनी परिसरात राहणारा किरण गुंजाळ स्वीट्स या दुकानासमोर हल्ला केला. यात किरण गुंजाळ याचा मृत्यू झाला.