Chhagan Bhujbal : 'जगात असा एकही देश नाही, जिथे महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा पुतळा नाही'. त्यामुळे मनोहर भिडे (Manohar Bhide) यांच्यावर कडक कारवाई व्हावी, या मताचा मी आहे. त्यांच्याबरोबर जाणं म्हणजे राजकारणाच्या दृष्टीने आत्मघातकी आहे. कोणतीही कारवाई होत नसल्याने ते रोज नवीन नवीन काहीतरी बोलतात. यावर आवर घातला पाहिजे, मुळात त्यांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही, हेच कळत नाही?" असे म्हणत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भिडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 


आज मंत्री छगन भुजबळ नाशिक (Nashik) शहरात असुन पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे वातावरण पेटले असून पावसाळी अधिवेशनात देखील त्याचे पडसाद उमटले आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी देखील कारवाईची भूमिका व्यक्त केली आहे. आज छगन भुजबळ नाशिकमध्ये असताना भिडे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, "खरं म्हणजे संभाजी भिडे यांच्यावर आम्हीसुद्धा एक केस दाखल केली आहे. आंबे खाल्ल्यानंतर मुलगा होईल या वक्तव्यावर कोर्टात ती केस सुरु आहे. महात्मा फुले यांच्यावर ते टीका करतात, पण महात्मा गांधी यांच्यावर देखील ते अत्यंत गलिच्छ पद्धतीने ते टीका करतात, मला खात्री आहे, पंतप्रधान मोदी किंवा अमित शाह कुणालाही हे आवडणार नाही."


ते पुढे म्हणाले, "महात्मा गांधींना अख्खं जग नमन करतं. मी अनेक ठिकाणी गेलो, जगात असा एकही देश नाही, जिथे महात्मा गांधी यांचा पुतळा नाही. त्यांच्यावर गलिच्छ स्वरुपात टीका करतात. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे" असे भुजबळ म्हणाले. पण कडक कारवाई होत नाही, म्हणून ते रोज नवीन नवीन काहीतरी बोलतात. काल ते पंडित नेहरुंनी (Pandit Nehru) देशासाठी काही योगदान नाही असं ते म्हणाले. पण त्यांचे वडीस देशातील सर्वात श्रीमंत वकील त्यांनी देशासाठी सर्व काही दिलं, स्वःत नेहरप साडे अकरा वर्ष नेहरु तुरुंगात राहिलेत, असेही भुजबळ यावेळी म्हणाले. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर त्यांची स्तुती करु नका, पण असली टीका मला आवडत नाही. आम्ही स्वतः त्यांच्या विरोधात कोर्टात आहे. पण कोर्टात तारीख वेळेवर मिळत नाही. मला कधी-कधी वाटतं की मनोहर भिडे यांचं डोकं ठिकाण्यावर आहे की नाही, तेच मला कळत नाही" असेही छगन भुजबळ म्हणाले.


मग आता काय करु, मी स्वतः रेल्वेने येतो


नाशिक-मुंबई महामार्गाचा (Nashik Mumbai Highway) प्रश्न सातत्याने उपस्थित होतो आहे. यावर भुजबळ म्हणाले, 'मग आता काय करु, मी स्वतः रेल्वेने येतो. तुम्ही रस्ता दुरुस्त करा, पण खड्डे नाही असं म्हणू नका. आम्ही सगळे आमदार ट्रेनने आलो. मुंबई महापालिका कोल्ड मिक्स वगैरे वापरते, ते वापरुन सुधारणा करा, असे आवाहन भुजबळांनी केले. तर नाशिक रस्त्याबाबत ते म्हणाले की, सध्या नाशिक शहर प्रशासनात अनेक नवीन अधिकाऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे नवीन दृष्टी प्रशासनाला लाभली आहे. नाशिक रस्त्यांबाबत देखील सुधारणा होईल अशी अपेक्षा करु, असे भुजबळ म्हणाले. 


हेही वाचा