CM Eknath Shinde Malegaon : लवकरच रिक्षावाले, फेरीवाल्यांसाठी महामंडळ उभारणार असून त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात आले आहेत. तसेच नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदान (Onion Subsidy) देणार असून बळीराजा आपला आहे. सरकार यामध्ये सकारात्मक भूमिका घेईल. तसेच अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान 100 टक्के पंचनामे झालेलं आहेत, हे राज्य कामगारांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं राज्य कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यक्त केला. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून आज मालेगावमध्ये (Malegaon) आहेत. 'शासन आपल्या दारी' या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून मालेगावमधून (Malegaon) सुरुवात झाली आहे. यावेळी सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्याचबरोबर काही महत्वाच्या घोषणा यावेळी त्यांनी केल्या. उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते म्हणाले कि, उद्धव ठाकरेंसमोर अनेक वेळा भूमिका मांडल्या, परंतु ठाकरेंनी भूमिका समजून न घेतल्याने आम्ही उठाव केला. आम्ही उठाव केल्यानंतर आमच्यावर नको नको ते आरोप केले गेले. शिवसेना अशीच मोठी झाली नसून शिवसेना मोठे करण्यासाठी आम्ही जीवाची बाजी केली असेही ते म्हणाले. तसेच विश्वासघात तुम्ही केला की मी याचा विचार ठाकरेंनी करावा असेही त्यांनी सांगितले.


पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले राज्य सरकारमध्ये आपण असताना आम्ही कमी कालावधीमध्ये अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांना 50 हजार रुपये रेगुलर कर्ज फेड करणाऱ्यांना आम्ही निर्णय घेतला असून त्याचा जीआर देखील मला आता मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पेट्रोल डिझेलवर पाच रुपये तीन रुपये कमी केले. तसेच पश्चिम वाहिन्या नद्या ज्या आहेत, त्या नद्या आहेत. या नद्यांचे पाणी समुद्राला वाहून जाते वळविण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारने  घेतला आहे. दुष्काळी भागातील जमीन सिंचनाखाली जमीन आणण्यासाठी वाहून जाणारे पाणी वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


तसेच शहरातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी आपण शासकीय विश्रामगृह जवळील एकात्मता चौक येथे यंदाची १४ एप्रिल साजरी करता येणार आहे.  मालेगाव महापालिकेचे अमृत योजना टप्पा दोनसाठी देखील पाणीपुरवठा वितरण योजना 86.66 कोटी आणि मल निस्सारण योजना टप्पा दोन 469 कोटी प्रस्तावित आहेत, याला देखील तातडीने मान्यता दिली जाईल. पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा विषय असून राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीने हे प्रकल्प पूर्ण होतील. 


त्याचबरोबर महिला बचत गटांना देखील साडेनऊ ते बारा टक्के दराने कर्ज पुरवठा केला जातो. नियमित कर्ज फेड करणाऱ्या बचत गटांना देखील सरसकट व्याजदरामध्ये सवलत देण्याची मागणीवर सरकार सकारात्मक भूमिका घेईल. पावरलूम व्यवसायामध्ये देखील जर वीस जणांमध्ये किंबहुना जो मोठा व्यवसाय असेल ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर लाखो लोक तिकडे काम करतात. त्यांना देखील ज्या काही अडचणी आहेत. त्या देखील सोडवण्याचं काम आपलं सरकार करेल. तसेच कांदा पिकाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्याची देखील मागणी पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 


मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत सकारात्मक 
मालेगाव जिल्हा निर्मिती ची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. दरम्यान मागणीबाबत सरकार सकारात्मक आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या विकासामध्ये आपल्या सगळ्यांचं तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुरावा असतो. मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील चर्चा केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे देखील चर्चा केली. तुमच्या मागणीसाठी पूर्णपणे सकारात्मक हे सरकार असून लवकरच या बाबतीमध्ये मंत्रालयामध्ये बैठक घेऊन आपण हा देखील निर्णय मार्गी लावू असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 


रिक्षा, फेरीवाल्यांसाठी महामंडळ 
आमदार दादा भुसे (MLA Dada Bhuse)) यांनीं सांगितले कि, राज्यात हातावर पोट भरणारे हजारो लोक आहेत. यांच्यासाठी एक महामंडळ बनवा. त्यांच्या मुलांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. त्यांच्या मुलांच्या शिक्षण झालं पाहिजे. त्यांच्या फॅमिलीला वैद्यकीय ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. त्यांचा आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे. यासाठी रिक्षावाले असतील, ड्रायव्हर असतील त्यांच्यासाठी एक महामंडळ तयार करण्याची विनंती केलेली आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो हा एकनाथ शिंदे तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. मला गरिबीची जाण आहे आणि म्हणून हे महामंडळ आम्ही युद्ध पातळीवर तयार करणार असल्याचे ते म्हणाले. सर्व सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम हे महामंडळ करेल. उदय सामंत आणि दादा भुसे यांच्यावर त्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.