Bhagatsingh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत आधीही म्हटलं होत कि, राज्यपाल हे वादग्रस्त नकोत निर्विवाद असायला हवेत. अशा पद्धतीने बोलणं टाळले पाहिजे. मुंबईत (Mumbai) अनेक राज्यातील लोक आली, मात्र मुंबईला मराठी माणसांनी मोठं केलं, हे कोणी नाकारू शकत नाही अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सुनावले आहे. 


राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या मुंबई बद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता नव्या वादळात सुरुवात झाली आहे. वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात देखील म्हटले दिसून येते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी देखील राज्यपालांची कान उघाडणी केली आहे. ते यावेळी म्हणाले, राज्यपाल महोदय आमचे मित्र त्यांनी अशा गोष्टी बोलणं टाळलं पाहिजे. मुंबई आणि आगरी समाजाची मुंबई आहे. मराठी माणसांची मुंबई आहे. ब्रिटिश काळातील प्रसिद्ध बंदर असल्यामुळे त्यावेळी मुंबईच्या भरभराटीला सुरवात झाली. देशातील अनेक राज्याच्या लोकांनी येऊन मुंबईच्या भरभरातील हात लावला. आंध्रप्रदेश, राजस्थान, केरळ राज्यातील नागरिक मुंबईत आलेले आहेत. परंतु मुंबई ही महाराष्ट्राची आहे पुढे नाकारू शकत नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले. 


ते पुढे म्हणाले कि, देशातील अनेक राज्याची लोकांनी मिळून मुंबईच्या भरभराटीला हातभार लावला आहे. मात्र मुंबई ही मराठी माणसाची आहे, हे कोणी नाकारू शकत नाही.. येथील भौगोलिक परिस्थिती संस्कृती भाषा मराठी माणसांची आहे, त्यामुळे अशा विषयामुळे वाद वाढतात.  वाद नको तर राज्यपाल निर्विवाद असावेत असेही भुजबळ यावेळी म्हणाले. 


राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले. 


गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. शुक्रवारी, मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान या वक्तव्यानंतर राजभरातुन राज्यपालांवर टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर राज्यपालांनी याबाबत आपले स्पष्टीकरण दिले आहे.