Nashik Shree Shree Ravishankar : आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर (Shree Shree Ravishankar) यांचा आज नाशिकमध्ये (Nashik) महासत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला जवळपास एक लाखाहून अधिक भाविक उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. आज सायंकाळी सहा वाजता नाशिक (Nashik) शहरातील ठक्कर डोम येथे महासत्संग (Mahasatsang) होणार आहे. श्री श्री रविशंकर यांच्या स्वागतासाठी नाशिक नगरी सज्ज झाली आहे.


आर्ट ऑफ लिविंगची तीस वर्षांपासून राबवली जाणारी आदर्श ग्राम योजना आणि विविध ग्रामीण प्रकल्पबाबत माहिती देणार असल्याचे समजते. अनेक वर्षानंतर श्री श्री रविशंकर यांचा नाशिकमध्ये सत्संग होणार आहे. ठक्कर डोम येथे होणाऱ्या महासत्संग कार्यक्रमासाठी तयारी करण्यात आली आहे. गान, ध्यान आणि ज्ञान या संकल्पनेनुसार सत्संगामध्ये सुश्राव्य भजन होणार आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार, जळगाव, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) आदी परिसरातून भाविक या महासत्संग सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे दिसून येते. 


ज्ञानगंगाच्या पार्श्वभूमीवर ठक्कर दोन येथे शंभर बाय 80 फुटाचे भव्य दिव्य स्टेज 80 फुटाचा रॅम्पवॉक अशी रचना करण्यात आली आहे. तसेच ठक्कर डोम परिसरात विविध ठिकाणी दुचाकी आणि चार चाकीसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर हजारो अधिक ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आल्याचे समजते. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या सानिध्यात मंगळवारी ठक्कर डोम येथे सायंकाळी 6  वाजता महासत्संग व सामूहिक श्रीरामरक्षा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, मैदानावर भव्य व्यासपीठ आणि रॅम्प बनविण्यात आला आहे. 


श्री श्री रवीशंकर यांच्या सानिध्यात महासत्संग आणि रामरक्षा पठण आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक आणि स्वयंसेवक यांनी सोहळ्याची तयारी केली आहे. महासत्संगानिमित्ताने पदयात्रा, बाईक रॅली, सत्संग, गुरुपूजा, रामरक्षा पठण या वेगवेगळ्या स्तरांवर स्वयंसेवकांची सेवा करीत आहेत. ज्ञानगंगाच्या पार्श्वभूमीवर ठक्कर डोम येथे 100  बाय 80 फूट फुटाचे भव्य दिव्य स्टेज, 80 फुटांचा रॅम्प वॉक, अशी रचना करण्यात आली आहे. महासत्संगानिमित्ताने आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक आणि स्वयंसेवांनी पदयात्रा गुरुपूजा, सत्संग शाळा कॉलेजेस, रामरक्षा पठण, हर घर ध्यान, बाईक रॅली, फ्लॅश मॉब असे उपक्रम जनजागृतीसाठी राबविण्यात आले.


Sri Sri Ravi Shankar: कोरोना हा आजार नाही तर 'बायोलॉजिकल वॉर' : श्री श्री रविशंकर