Maharashtra Politics : राज्यातील सत्ता संघर्षाचा (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च फैसला काही मिनिटात दिल्लीत होत असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा होत्या. मात्र झिरवाळ कुठंही गेलेले नसून नाशिक शहरात आहेत. आज सकाळी झिरवाळ यांनी मिसळीवर ताव मारल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आदिवासी विकास विभागाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते नाशिकमध्ये असणार आहेत. 


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Politics) निकाल आता अवघ्या काही मिनिटांवर आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा (Maharashtra Politics) बदलवणारा हा निकाल असणार आहे. काही महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होऊन राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. गेल्या नऊ महिन्यांपासून यावर सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्ष सुरु आहे. या सर्व प्रक्रियेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे झिरवाळ नेमके नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र मी नॉट रिचेबल नसल्याचे झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे. 


विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari ZIrwal) हे आज सकाळपासून उपस्थित असून सकाळी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांचा फोन बंद येत होता. त्यामुळे ते नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चाना उधाण आले होते. मात्र खुद्द नरहरी झिरवाळ यांनी आपण कुठेही गेलेलो नाही, जाण्याचा प्रश्न नाही. आज नाशिकमध्ये आदिवासी विकास विभागाच्या एका इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम असल्याने शहरातच असणार आहे. याच सुमारास नरहरी झिरवाळ हे कार्यकर्त्यांबरोबर मिसळीवर ताव मारताना दिसून आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले कि, मी नॉट रिचेबल नव्हतो... तर इथेच होतो. सत्ता संघर्षाच्या निकालावर माझ्यासह देशभरातील जनतेचे लक्ष आहे, त्यामुळे कुठेही जाणार असल्याचे झिरवाळ म्हणाले...  


संजय राऊतांचे सूचक वक्तव्य 


दरम्यान 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील निर्णय आज लागणार आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) हे नॉट रीचेबल असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ते नाशिक शहरातच आहेत. या सर्व घडामोडीवर पक्षांचे नेते निकालावर लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे या सर्व प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणारे नरहरी झिरवाळ कालपासून ट्रेंडिंगवर आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज  वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र!' अशा आशयाचे ट्वीट राऊतांनी केलं आहे.