Maharashtra Politics : राज्यातील सत्ता संघर्षाचा (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च फैसला (Supreme Court) काही तासांत दिल्लीत (Delhi) लागणार असून त्याकडे राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र नाशिकला (Nashik) येणार आहेत. विशेष म्हणजे, ठाकरे गटाचे शिक्षक मतदारसंघातील आमदार किशोर दराडे यांच्या कुटुंबातील लग्न सोहळ्यासाठी ते नाशिकला येणार असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. 


सत्ता संघर्षाच्या निकालाचा महत्वाचा  दिवस असून निकालासाठी काही महिने शिल्लक आहेत. गेल्यावर्षी शिवसेनेत (Shivsena) फुट पडली आणि चाळीस आमदारांनी वेगळा गट स्थापन करून ही खरी शिवसेना, असा दावा केल्यावरून निर्माण झालेल्या कायदेशीर लढाईबाबत आज सर्वोच्च न्यायालयात फैसला होणार आहे. त्यामुळे आजच्या घडामोडीकडे राजकीय वर्तुळ आणि सामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे. कदाचित निकालानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता असून आमदारांच्या बैठकादेखील तातडीने घेतल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र, हे सर्व घडण्याची शक्यता वर्तवली जात असताना सर्व घडामोडींचे केंद्रबिंदू असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मात्र, नाशिकमध्ये येणार आहेत. 


दरम्यान आज दुपारी साडे तीन वाजता ते मुंबईतून नाशिकला येणार असून सव्वा चार वाजता हेलिकॉप्टरने त्र्यंबकरोडवरील द ग्रेप काऊंटी येथे ते येणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांचे पुत्र शुभम यांच्या लग्नासाठी येणार आहेत. विशेष म्हणजे, आमदार दराडे हेदेखील त्यांचे बंधू नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या प्रमाणेच ठाकरे गटाचे आमदार आहेत; परंतु ते ठाकरे गटाचे असूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे राज्यात एवढा मोठा सत्ता संघर्ष सुरू असताना मुख्यमंत्र्यांची ठाकरे गटाच्या आमदाराकडे हजेरी हा चर्चेचा विषय ठरला आहे.


संजय राऊतही नाशिकमध्ये येणार


राज्यातील सत्ता संघर्षांची सुनावणीचा दिवस आज असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतदेखील (Sanjay Raut) नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. तेदेखील आमदार दराडे यांच्याकडील विवाह सोहळ्यास हजेरी लावणार आहेत. येवल्याचे आमदार दराडे बंधू हे ठाकरे गटातील आहेत. मात्र, ते महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) घटक पक्ष असलेल्या महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विरोधात आहेत आणि गुरुवारी छगन भुजबळ मात्र मुंबईत असणार आहेत.