Saptshrungi Devi : नाशिकच्या (Nashik) सप्तशृंगी मातेच्या (Saptshrungi Devi) मूर्ती संवर्धनानंतर मंदिर प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. श्री सप्तशृंगी देवीच्या पूजा विधी संदर्भातला हा महत्वपूर्ण निर्णय असून सप्तशृंगी मातेच्या मूर्तीवरून शेंदूर काढण्यात आल्यानंतर आता दररोज होणारा पंचामृत अभिषेक (Saptshrungi Devi Mahapuja) सप्तशृंगी देवी मूर्तीवर होणार नाही, तर पर्यायी व्यवस्था म्हणून देणगीदार भाविकांच्या योगदानातून तयार करण्यात आलेल्या चांदीच्या मूर्तीवर होणार आहे. 


नाशिक येथील सप्तशृंगी मातेच्या दैनंदिन पूजाच्या आणि विधीमध्ये मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पंचामृत अभिषेक संदर्भीय प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून त्या अनुषंगिक भाविक वर्गात प्रबोधन व्हावे तसे ते अंतर्गत झालेल्या बदलाचे अधिकृत माहिती भाविकांना उपलब्ध होणे या दृष्टीने विश्वस्त संस्थेच्या वतीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सप्तशृंगी देवीचे स्वरूप हे हजार वर्षांपासून असून लाखोच्या संख्येने भाविक दरवर्षी श्री सप्तशृंगी देवीच्या चरणी नतमस्तक होतात. दरम्यान काही दिवसांपूर्वी सप्तशृंगी मातेच्या मूर्ती संवर्धनाने देखभाल प्रक्रियेनंतर 1100 किलो शेंदूर मातेच्या मूर्तीवरून काढण्यात आला. त्यानंतर वर्षानुवर्षी डोळ्यात भरलेलं सप्तशृंगी मातेचे रूप बदललेलं पाहायला मिळालं. त्यामुळे आता भगवतीच्या मूळ स्वरूपाचा जतन व्हायला हवे म्हणून हा निर्णय देवस्थान समितीतर्फे घेण्यात आला आहे. 


दरम्यान सप्तशृंगी गड मूर्तीचे संवर्धन न करण्यात आले असून सप्तशृंगी देवीवरील शेंदूर काढण्यात येऊन श्री सप्तशृंगी देवीची अत्यंत प्राचीन आणि मूळ तेजोमाई स्वरूप श्री भगवती मूर्ती प्राप्त झाले आहे. त्यामुळे सदर सप्तशृंगी देवीच्या मूळ स्वरूपाचे जपवणूक व जतन करण्याची जबाबदारी विश्वस्त मंडळ पुरोहित वर्ग तसेच भाविक भक्तांचे आहे. 26 सप्टेंबर म्हणजेच नवरात्रोत्सवापासून (Navratri 2022) सप्तशृंगी मातेचे मंदिर दर्शनासाठी खुले होणार असून भगवतीच्या उत्सव मूर्तीवर म्हणजेच चांदी धातूच्या मूर्तीवरच अभिषेक करण्यात येईल अशी माहिती देखील मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 


अशी असते पंचामृत महापूजा 
पंचामृत महापूजा ही सकाळी सात ते नऊ या वेळेत होते. या वेळेत महापूजेत देवीला दही, दूध, तूप, मध, सुवासिक तेल व पिठीसाखर यांची पंचामृत स्नान घातले जाते. या स्नानानंतर देवीच्या मस्तकावरून अकरा हजार लिटर दुधाचा अभिषेक श्री सुक्ताचे 16 आवर्तनाने केला जातो. मग देवीला गरम पाण्याने स्नान घालून मूर्ती वस्त्राने पुसून कोरडी केले जाते.  शेंदुर्लेपन करून देवीला सोयीसह महावस्त्र म्हणजेच पैठणी नेसून कपाळावर कुंकू लावले जाऊन देवीला अलंकार चढवले जातात. आरतीनंतर मंत्रपुष्पांजली व अपराध क्षमापन स्त्रोत्र म्हटले जाते. जवळपास दोन तासाची ही पूजा देवीची केली जाते. 


25 किलोची चांदीची मूर्ती 
साधारण 25 किलो चांदी धातूची मूर्ती तयार करण्यात आली असून त्यावर पंचामृत महापूजा करण्यात येईल. भगवतीच्या मूळ स्वरूपाला पुन्हा काही इजा होऊ नये किंवा त्यात बदल होऊ नये. वर्षानुवर्ष भाविकांना भगवतीच्या मूळ स्वरूपाचे दर्शन व्हावे, म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. पंचामृत अभिषेक पूजेच्या नियमात बदल करण्यात आला असून दैनिक स्वरूपात भगवतीच्या मूर्तीवर जो अभिषेक केला जातो. त्यात पाणी, दूध, लोणी, मध, साखर, नारळ पाणी आणि तुपाचा वापर केला जात असायचा. मात्र आता पर्यायी व्यवस्था म्हणून देणगीदार भाविकांच्या योगदानातून साधारण 25 किलो चांदीची मूर्ती तयार करण्यात आली असून त्यावर पंचामृत पूजा महापूजा करण्यात येईल. 


विश्वस्त मंडळ म्हणाले... 
देणगीदार भाविकांच्या योगदानातून सप्तशृंगी देवीची 25 किलो चांदीची चांदी धातूची उत्सव मूर्ती तयार करण्यात आली असून त्यावर पंचामृत महापूजा विधिवतपणे करण्यात येणार असल्याचे नियोजन विश्वस्त संस्था व पुजारी वर्गाच्या मार्गदर्शक नुसार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे सदर बदल विचारात घेऊन या पुढे भाविकांनी उत्सव मूर्तीवरील पूजेला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे यापुढील विश्वस्त संस्था व पुजारी वर्गाने निर्धारित केलेले महत्वाचे सण उत्सव व मुहूर्त वगळता इतर सर्व दिवशी चांदीच्या उत्सव मूर्तीवरच असे भगवतीची पंचामृत महापूजा नियोजित असेल असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.