Nashik Leopard : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर परिसरात (Sinnar) काही दिवसांपासून बिबट्याचा (Leopard) धुमाकूळ पाहायला मिळता आहे. दोन दिवसांपूर्वी दोन बिबट्यांच्या नारळाच्या झाडावर चढून दंगामस्ती करतानाचा व्हिडीओ (Viral Video) चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर काल सांगवी परिसरातच असलेल्या बंगल्याच्या टेरेसवर फेरफटका मारतानाचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी सिन्नर परिसरातील सांगवी गावानजीक असलेल्या घुमरे वस्तीवर बिबट्याच्या दंगमास्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली होती. या ठिकाणी पिंजरे लावून त्रप कामेरे देखील लावण्यात आले. तदनंतर परिसरात सायंकाळच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. रविवारी सकाळी नारळाच्या झाडावर मस्ती केल्यानंतर बिबट्याची सफारी आता एका बंगल्यावर दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील सांगवी शिवारात शांताराम घुमरे आणि सुनील घुमरे यांच्या नारळाच्या झाडावर दोन बिबटे लपाछपी करत असताना शेतकऱ्यांनी मोबाईलच्या कॅमेरे शूट केले होते. त्यानंतर वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन पिंजरा लावला होता. तसेच कॅमेरे देखील या ठिकाणी या परिसरात लावण्यात आले होते. वन विभागाने सुनील सकाळी घुमरे यांच्या वस्तीवर जाऊन पाहणी केली. दरम्यान सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास सांगवी शिवारात खोल रस्त्यावरील एका बंगल्यावर बिबट्या फिरत असल्याचे अनेकांनी पाहिले. काही जणांनी मोबाईलच्या कॅमेरात बिबट्याचा बंगल्यावरील फेरफटका कैद करण्यात आला आहे. वनविभागात या घटनेची माहिती तातडीने देण्यात आली.
दरम्यान सोमवारी दुपारच्या सुमारे सिन्नर शहरात मल्हारी घुमरे यांच्या वडाच्या झाडावर बिबट्या आराम करीत असल्याचे अनेकांनी पाहिले थोड्या वेळाने बिबट्या आयटीत वडाच्या झाडावरून खाली उतरला. सांगवी शिवारात बिबट्या कधी नारळाच्या झाडावर तर कधी वडाच्या झाडावर आणि सायंकाळी चक्क एका बंगल्यावर फेरफटका मारत असल्याचे सांगवी येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे. या घटनेने परिसरात नागरिकांनी धास्तावले आहे.
त्र्यंबकेश्वर परिसरातही दहशत
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल परिसरातील रानघर शिवारात डुक्कर घाला शिवारातील झापात बांधलेल्या बैलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावर निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. हरसुल जवळील शिरसगाव येथील शेतकरी पांडुरंग चंद्र महाले यांच्या झापात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने बांधलेल्या बैलावर जोरदार हल्ल्या चढवला. या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाला. हरसुल परिसरात दिवसेंदिवस बिबट्याचे दिवसाढवळ्या दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.