Lasalgaon Bajar Samiti : नाशिकच्या (Nashik) लासलगाव बाजार समितीत (lasalgaon Bajar samiti) आज डाळिंब लिलावाला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान सुरुवातीला छत्रपती संभाजी नगर येथील डाळिंब उत्पादक शेतकरी शहा अन्सार यांनी आणलेल्या डाळिंबातील पहिल्या कॅरेटला 5 हजार 100 रुपये एवढा भाव मिळाला. त्यामुळे इतर डाळिंब उत्पादक (Pomegranate growers) शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चालू हंगामातील डाळिंब लिलाव आजपासून सुरु करण्यात आले आहेत. 


नाशिक जिल्ह्यातील लासलगाव (Lasalgaon), निफाड, चांदवड, येवला, चांदवड, देवळा, सटाणा, कळवण, मालेगाव, सिन्नरसह नगर व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड (Pomegranate Seed) केली जाते. या डाळिंब विक्रीची सोय व्हावी म्हणून लासलगाव बाजार समिती गेल्या नऊ वर्षांपासून डाळिंबाचे लिलाव होत आहे. शेतकरी व व्यापारी वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येथून दररोज देशातर्गत दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, बिहारसह इतर राज्यात मोठ्या प्रमाणत डाळिंब जात आहेत. याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होत असून त्यामुळे चालू हंगामातील डाळिंब लिलाव जून महिन्यापासून सुरु करण्यात आले आहेत. 


दरम्यान आज 300 ते 400 कॅरेट डाळिंबाची आवक झाली होती. जास्ती जास्त 5100, कमीत कमी 200 रुपये तर सरासरी 2011 रुपये इतका प्रति कॅरेट बाजार भाव मिळाला. डाळिंब उत्पादकांनी योग्य प्रतवारी करून 20 किलोच्या कॅरेटमध्ये डाळींब विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. लासलगांव बाजार समितीने कांद्या बरोबर आता आम्हाला डाळिंब विक्रीची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. यामुळे इतर जिल्ह्यात जाऊन डाळिंब विक्री करण्याची राहिली नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. वाहतूक खर्चही वाचत आहे. या बाजार समिती विक्रीसाठी आणलेल्या कांद्या बरोबर आता डाळिंबाला ही चांगला बाजारभाव मिळत आहे. आज माझ्या डाळिंबाला 5200 रुपये इतका शुभारंभ बाजार भाव मिळाला. 


शेतकऱ्यांकडून समाधान 


आजपासून लासलगाव (Lasalgaon) येथील डाळिंब लिलाव होत असल्याने परिसरात शेतकरी समाधानी आहे. कांद्याच्या बाजारपेठेसह डाळिंबाची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने तेथील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. आज या लिलावामध्ये शेतकऱ्यांसह महिला शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग देखील नोंदवण्यात आला. आजपासूनच लिलावाला सुरवात झाल्याने हळूहळू शेतकऱ्यांची वाढ होऊन आवक वाढण्यास सुरुवात होईल. तसेच सुरुवातीला असणारे सरासरी दरही वाढत जाण्याची शक्यता आहे. 


Nashik Lasalgaon : शेतकरी लासलगाव बाजार समितीत दाखल, अजुनही कांदा खरेदी नाही