Nashik News : तारपा नृत्य (Tarpa dance), आदिवासी संगीत, संस्कृती, लोककलांचा जागर, गुलाबी थंडीतलं कवी संमेलन (Kavi Sammelan) अन बरंच काही एकाच व्यासपीठावर नाशिककरांना (Nashik) अनुभवयाला मिळालं आहे. यावेळी नाशिकमध्ये संमेलनाच्या रूपाने लोककलेचा (Lokkala) केवळ जागरच नाही, तर त्या जतन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याचं मत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी व्यक्त केलं. 


नाशिक मध्ये गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शेकोटी लोककला साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात साजरा झाले. त्यावेळी उघटनाच्या कार्यक्रमात डॉ. चंदनशिवे बोल्ट होते. यावेळी ते म्हणाले कि, शेकोटी लोककला साहित्य संमेलन हा अत्यंत आगळ्यावेगळ्या प्रकार असून यातून होत असलेला जागर म्हणजे केवळ ठिणगी आहे. याला लवकरच वैश्विक रूप येणार आहे मात्र हे ठिणगी समानतेची असली पाहिजे, विषमतेची नाही यातून लोककलांचा जागर होतो आहे.  आत्मक्लेष लोककला मेल्या तरी चालतील मात्र आमची लोककला ग्लोबल झाली पाहिजे, असा संवाद लोककलेचा अभ्यासक मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे यांनी व्यक्त केला.


यावेळी शेकोटी संमेलनाला सुरुवात झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील लोककलावंतांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर लोककला अविष्कार सादर करण्यात आले. यानंतर रसिकांच्या मनावर ठेवून ठेवणारा गझल कट्टा सादर करण्यात आला त्यानंतर रात्री नऊ वाजेला शेकोटी कवी संमेलन देखील भरवण्यात आले यानंतर धिंडवळी गाणे, थाळगाणे, ढाकवाद्य, पावरी नृत्य जागरण गोंधळ पहाटेपर्यंत या शेकोटी संमेलनात हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दरम्यान आजच्या कार्यक्रमात सकाळी आठ वाजता तळी भरणे, त्यानंतर कथाकथन कार्यक्रम, अहिराणी कवी संमेलन, बालकवी संमेलन, महिला परिसंवाद, त्यानंतर दुपारी निमंत्रित कवी संमेलन, हळदीकुंकूचा कार्यक्रम देखील यावेळी आयोजित करण्यात आल्याने उपस्थितांना एक आगळीवेगळी मेजवानी या शेकोटी लोककला साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नाशिक मध्ये अनुभवास मिळाली.


संमेलनात साडे सहा फूट तारपा आकर्षण
नाशिक शहरातील सुरू असलेल्या शेकोटी लोककला साहित्य संमेलनात सगळ्यांचे लक्ष वेधले ते या साडेसहा फूट तारपाने. राष्ट्रीय संगीत नृत्य आणि नाटक अकादमी नवी दिल्ली यांच्याकडून नुकताच संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार 2022 जाहीर झालेल्या जव्हार तालुक्यातील वाळवंटा येथील 84 वर्षे जेष्ठ तारपा वादक भिकल्या धिंडा यांनी या संमेलनात सहभाग घेत तारपा वादन आणि नृत्यही केले. या तारपाविषयी ते म्हणाले की तारपा हे आदिवासी वाद्यातील प्रमुख सुर वाद्य म्हणून ओळखले जाते. तारपा या सुषिर वाद्यावर आधारित दर्प हे आदिवासी लोकनृत्यही प्रसिद्ध आहे. दोन फूट ते सहा ते सात फूट लांबीचे वाद्य महाराष्ट्रातील आदिवासी वाजवतात.