Nashik News : मनमाड (Manmad) रेल्वे स्थानकावर आज दुपारच्या सुमारास अचानक जनशताब्दी एक्सप्रेसचे (Janshatbadi Express) रेल्वे इंजिनचे कपलिंग (Cupling) तुटल्यामुळे अर्धी गाडी पुढे निघून गेल्याची घटना घडली. मात्र वेळीच स्थानिक रेल्वे प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्याने मोठा अपघात टळला आहे. दरम्यान गाडी थांबविण्यात आल्याने मनमाड-मुंबई मार्गावरील (Manamd Mumbai ) सर्व गाडया हया उशिरा धावण्याची शक्यता स्थानिक रेल्वे प्रशासनानाने वर्तवली आहे. 


जालना रेल्वे स्थानकातून (Jalna railway Station) सकाळी साडे आठ वाजता निघाल्यानंतर मुंबईच्या दिशेने जात असताना मनमाड रेल्वेस्थानकावर हि घटना घडली. मनमाड रेल्वे स्थानकावर (Manmad Railway) आल्यानंतर गाडी सुरु झाल्यानंतर अचानक या गाडीचे दोन डब्यांमधील सांधेजोड (कपलिंग) तुटले. सांधेजोड तुटताच दोन्ही बाजुचे डबे एकमेकांपासून विलग झाले. कपलिंग तुटून अर्धी गाडी पुढे निघून गेली होती. यावेळी एकच गोंधळ उडाला. ही माहिती मनमाड रेल्वे स्थानक मास्तरना कळताच त्यांनी तातडीने ही माहिती देखभाल, दुरुस्ती पथकाला दिली. दरम्यान कपलिंग तुटल्यामुळे सव्वा तासा पासून गाडी रेल्वे स्थानकावर उभी होती. 


मनमाडहुन -मुबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेसच्या डब्याची कपलिंग बेरिंग तुटली. गाडी सुरु झाल्यावर कपलिंग तुटल्यामुळे सव्वा तासा पासून गाडी रेल्वे स्थानकावर उभी होती. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी नाही, मात्र अचानक कपलिंग तुटल्याने गोंधळ उडाला. महत्वाचे म्हणजे रेल्वे स्थानकावर कपलिंग तुटल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या कालावधीत मुंबईहून नाशिकमार्गे पुढे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या होत्या. ऐन गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने प्रवाशांचे हाल झाले. शिवाय नवीन स्वागतासाठी अनेक जण मुंबई, नाशिक प्रवास करत असताना सांधेजोड तुटल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला.


दरम्यान दुरुस्तीचे काम पथकाने काही वेळात पूर्ण केले. त्यानंतर या मार्गिकेवरुन जनशताब्दी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. त्या पाठोपाठ मुंबईकडे जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या सोडण्यात आल्या. जवळपास सव्वा तास दुरुस्ती कामासाठी जनशताब्दी एक्सप्रेस खोळंबल्याने त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला. रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून या घटनेनंतर इतर गाड्या उशिराने धावत होत्या. मनमाड रेल्वे स्थानकावर जनशताब्दी एक्सप्रेसचे सांधेजोड तुटल्याने काही वेळ या मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळंबली होती. सव्वा तास दुरुस्तीसाठी लागल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे, अशी माहिती मनमाड रेल्वे प्रशासनाने दिली.