Nashik Crime : नाशिक (Nashik) शहर आणि जिल्ह्यात दररोज पोलीस ठाण्यात (Nashik Police) दोन ते तीन मुलं मुलींच्या अपहरणांच्या घटनांची नोंद होते. त्यामुळे सद्यस्थितीत मुलांच्या अपहरणाचा प्रश्न सातत्याने पुढे येत आहे. यात अनेकदा अल्पवयीन मुलमुलीं या शाळेत किंवा कॉलेजात जाण्याच्या बहाण्याने पळून जाण्याच्या घटना निदर्शनास आलेल्या आहेत. मग पोलीस ठाण्यात अपहरणाची नोंद केली जाते.
नाशिक शहरासह जिल्ह्यातील अल्पवयीन तरूण तरूणी प्रेमात पडून घरातून पळून जाण्याच्या घटना सातत्याने वाढत चालल्यामुळे देवळा पोलिसांचे दामिनी पथक सक्रिय झाले असून, देवळा (Deola) शहरातील शिवस्मारक परिसरातील उद्यान, बस स्थानक परिसरात दोन कॅफे हाऊसवर कारवाई करण्यात आली आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात दरररोज पोलीस ठाण्यात दोन ते तीन मुलं मुलींच्या अपहरणांच्या (Kidnap) घटनांची नोंद होते. त्यामुळे सद्यस्थितीत मुलांच्या अपहरणाचा प्रश्न सातत्याने पुढे येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या देवळा तालुक्यातील नागरीक व पालकांच्या आलेल्या तक्रारींची पोलिसांनी दखल घेतली असून महाविद्यालय सुटल्यानंतर दामिनी पथकाने शिवस्मारक उद्यान तसेच बसस्थानकावर जाऊन शंका आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींची चौकशी करून त्यांना सक्त ताकिद देण्यात आली. यानंतर दामिनी पथकाने बसस्थानक परिसरात असलेल्या दोन कॅफे हाऊसवर कारवाई केली.
दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता यावेळी कॅफे हाऊसमध्ये विशिष्ठ हेतूने आडोसा तयार करण्यासाठी लावलेले पडदे कॅफे हाऊसच्या संचालकांना काढण्यास सांगून यापुढे कॅफे हाऊसमध्ये पडदे लावू नये, असा आदेश देण्यात आला. यापुढे नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद देण्यात आली. देवळा पोलिसांनी अशा प्रेमी युगुलांवर कारवाई केल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणाऱ्यांना चाप लागला असून हि कारवाई यापुढेही अशीच सुरू ठेवावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे.पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, पोलिस नाईक ज्योती गोसावी, ऋतिका कुमावत, माधुरी पवार, हवालदार चंद्रकांत निकम आदींच्या पथकामार्फत हि कारवाई करण्यात येत आहे.
पोलिस निरीक्षक देवळा येथील पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे म्हणाले कि, मोबाईल व सोशल मिडीयामुळे घरातून पळून जाण्याचे प्रकार वाढत आहेत. याबाबत पालकांनीच आता सजग होण्याची गरज आहे. आपल्या पाल्याच्या शाळेची वेळ, त्यांचे मित्र मैत्रिणी याबाबत पालकांनी अधून मधून चौकशी केली पाहीजे तसेच आपल्या पाल्याच्या वर्तणुकीत बदल दिसून आल्यास त्याच्याशी संवाद साधला पाहीजे. ह्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तालुक्यात दामिनी पथक सक्रीय केले आहे. तसेच पोलिसांनी केलेली कारवाई स्तुत्य असून यापुढेही अशी कारवाई पोलिसांनी सुरू ठेवावी. तसेच देवळा तालुक्यात अल्पवयीन मुला मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून या कारवाईमुळे अशा घटनांना आळा बसेल. देवळा नगरपंचायतीने शिवस्मारक उद्यान सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत बंद ठेवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता राजेश आहेर यांनी केली आहे.