Nashik Graduate Constituency : विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची (Nashik Graduate Constituency) निवडणूक रंगत चालली आहे. नाशिक (Nashik), अमरावती, नागपूर (nagpur), औरंगाबाद (Aurangabad), कोकण शिक्षक या मतदारसंघात या निवडणुका होत आहेत. पहिल्या दिवसांपासून ते आतापर्यंत नवनव्या घडामोडी या निवडणुकीत पाहायला मिळत आहेत. ही निवडणूक नेमकी कशी असते, या निवडणुकीत मतदान कोण करतं, निवडणूक प्रक्रिया कशी असते, हे समजून घेणं महत्वाचे आहे. 


विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) शिक्षकांनी पदवीधर मतदारसंघाचा रिक्त होत असलेल्या पाच जागांसाठी येत्या 30 जानेवारीला मतदान होत आहे. 2 फेब्रुवारी या निवडणुकीचे निकाल जाहीर होतील, राज्यातील सत्तांतरानंतर होत असलेल्या निवडणुकांबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मागील निवडणुकीचा इतिहास पहिला तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे नागपूर शिक्षक मतदारसंघात नागो गाणार अपक्ष कोकण शिक्षक मतदार संघात अपक्ष बाळाराम पाटील नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे अमरावती पदवीधर मतदार संघात भाजपचे रणजीत पाटील हे निवडून आले होते या पाचही जागांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे. 


दरम्यान या निवडणुकीत मतदार कोण? तर शिक्षक आणि पदवीधर प्रत्येक निवडणुकीआधी मतदारांना नव्याने नाव नोंदणी करावी लागते. पात्रतेचे निकष पूर्ण करावे लागतात. नोंदणीकृत मतदारच मतदान करू शकतात. मतदानासाठी पसंतीची पद्धत विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेत थेट निवडणूक प्रक्रिया होत नाही. इथे राष्ट्रपती सिनेटसारख्या निवडणुकीतील पसंती क्रमाची पद्धत वापरली जाते. संबंधित मतदार आणि उमेदवारांच्या नुसार आयोग एक कोटा निश्चित करतो. निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकाची मते मिळवणारे उमेदवार विजयी होतो. पहिल्या पसंतीची मते कोट्याएवढी नसली तर दुसऱ्या पसंतीची मते जो उमेदवार पूर्ण करील तो विजयी होतो. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजय होऊ शकतो. यात कोणाचेही मतदान वाया जात नाही. 


अशी असते मतदान प्रक्रिया... 


विधानपरिषद निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुले मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावे लागते. पण विधान परिषद आमदार गुप्त मतदान करतात त्यामुळेच विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता असते. निवडणुकीसाठी जितके मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवार ना पसंती क्रम देता येतो. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होतात. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. विधान परिषद स्थायी सभागृह आहे. ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षांनी सभागृहाचे एकास तीन सदस्य निवृत्त होतात तेवढेच नव्याने निवडतात.


या मतदारसंघात निवडणूक 


राज्यातील पाचही जागांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे. तर या पाच जागांवर सध्या औरंगाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे विरुद्ध भाजपचे उमेदवार किरण पाटील अशी लढत. नाशिक पदवीधर मतदारसंघात सध्या अपक्ष सत्यजीत तांबे व अपक्ष शुभांगी पाटील यांच्यात लढत अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे डॉ. रणजित पाटील, काँग्रेसकडून धीरज लिंगाडे हे आमनेसामने आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे काळे विक्रम वसंतराव, भाजपकडून पाटील किरण नारायणराव हे दोघे महत्वाचे उमेदवार आहेत. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षक भारतीचे धनाजी पाटील, शेकाप व महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार बाळाराम पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. तर नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपचे नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे व महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.