Hemant Godse : खासदार हेमंत गोडसे (Hemant Godase) यांनी संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला असून अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या सिनेमातील डायलॉगच्या माध्यमातून खासदार राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. एक मच्छर आदमी को .. बना देता है, असं म्हणत, मच्छर काय करू शकतो हे वेगळं सांगायची गरज नसल्याचे म्हणत गोडसे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय.
दरम्यान काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये (Nashik) आलेल्या संजय राऊत यांनी गोडसे यांच्यासह प्रवेश केलेल्या इतरांचा चागंलाच समाचार घेतला होता. त्यानंतर हेमंत गोडसे यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, कुणी काहीही टीका करू देत, आम्ही आमच काम करतोय. इतरांना टिकेला उत्तर देण्यापेक्षा आम्ही कामावर लक्ष देतो. त्यामुळे आम्ही कमी बोलतो आणि जास्त काम करतो. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी मच्छरची उपमा दिली, तर त्यांना सांगतो की नाना पाटेकरच्या यशवंत पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, की एक मच्छर आदमी को...बना देता है, आम्ही तर छत्रपतींचे मावळे आणि शिवसेनाप्रमुखांचे विचारांचे वारसदार आहोत, त्यामुळे काय करू शकतो हे वेगळं सांगायची गरज नाही असे गोडसे म्हणाले.
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर हेमंत गोडसे यांनी प्रत्युत्तर देताना म्हणाले की, संजय राऊत यांना माहित नाही ना, मच्छर चावल्यानंतर डेंगू होतो, प्लेटलेट कमी होतात? मच्छर काय करू शकतो. आम्ही तर छत्रपतींचे मावळे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आम्ही विचारांचे वारसदार आहोत, त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात सगळं समोर येईलच असा इशारा यावेळी गोडसे यांनी दिला. शिवाय जनतेला माहित आहे की, खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे काम कोण करत आहे. एकनाथ शिंदे यांनी जे पाऊल उचललं. त्यासोबत 40 आमदार, 12 खासदार आणि नाशिक महापालिकेतील 12 माजी नगरसेवक सहभागी झाले आहेत. आमचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे सांगत येत्या काळात शिंदे गटात येणाऱ्यांची संख्या वाढतच जाईल, असंही गोडसे म्हणालेत.
नाशिक महापालिकेचे 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर, त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी, मनसेच्या कार्यकर्त्यांनी नाशिक शिंदे सेनेत प्रवेश केला. यावेळी मंत्री, खासदार, आमदार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे विचार आणि हिदुंत्व यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहे. आता माजी नगरसेवकासह कार्यकर्त्यांची संख्या ही बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये वाढत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची पायाखालची वाळू सरकत आहे. आगामी काळात देखील नाशिक महापालिकेवरच आमच्या शिवसेनेचाच महापौर बसणार आहे. आम्हाला मच्छरांची उपमा दिली, मात्र आम्ही छत्रपतींचे मावळे असून तसेच शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे वारसदार आहे. त्यामुळे एकर मच्छरमुळे डेंगू, मलेरिया, प्लेटलेट कमी होतात हे राऊत यांना माहित नसावे असा उपरोधिक टोला देखील गोडसे यांनी लगावला.