Nashik News : अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) नाशिक (Nashik) कार्यालयाने गुटखा प्रतिबंधित अन्नपदार्थ तसेच भेसळयुक्त पदार्थांविरुद्ध कारवाई सुरू केली असून अशातच आता विल्होळी (Vilholi) परिसरात राज्यात अवैध असलेला गुटखा हस्तगत करण्यात अन्न व औषध प्रशासनाला यश आले आहे. 


दरम्यान काही दिवसांपासून एफडीएने (FDA) अवैध वाहतूक करणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई सुरु केली असून नाशिक शहरासह सिन्नर  (Sinnar) परिसरात यापूर्वी कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गोपाळकासार यांना प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन नाशिक यांनी विल्लोळी येथे भावनाथ गल्लीत वास्तव्य करणाऱ्या शिवाजी रघुनाथ भावनाथ यांच्या घरी धाड टाकली.


अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखूचा प्रकारचा 15 प्रकारचा साठा विक्रीसाठी आढळून आला. कारवाईत हस्तगत केलेल्या मुद्देमालाचे एकूण रक्कम एक लाख 43 हजार 826 इतका विक्रीसाठी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनांचे अन्न सुरक्षा अधिकारी गोपाळ कासार यांनी सदर प्रकरणी संपूर्ण साठा हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे


तर दुसरी घटना आहे, नाशिक शहरातील बिडी कामगार परिसरात घडली असून या कारवाईस सुमारे एक लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनच मिळालेल्या माहितीनुसार बिडी कामगार नगर पंचवटी परिसरात उभे असलेली वाहन पिकपमध्ये महाराष्ट्र राज्यात उत्पादन, विक्री, साठवणीसाठी प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थ साठा वाहतूक करताना आढळून आला. अन्न व औषध प्रशासनाने त्यावर कारवाई करत मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये पान मसाला व सुगंधित तंबाखूची पाकिट आढळून आली. याप्रकरणी वाहन चालक जितेंद्र रघुनाथ नेरपगार यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध आडगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.