Gulabrao Patil : बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) नाव वापरू नको हे पाचव्या सहाव्या वेळेस झाले असून त्यामुळे त्या गोष्टीला किती धार द्यावी, हे मला तरी वाटतं चुकीचं होईल. उद्धव ठाकरेंसोबत (udhhav Thackeray) मी 35 वर्षे राहिलो आहे, त्यांचे शब्द प्रयोग माहिती आहेत, त्यामुळे आम्ही रक्त पिणारे नाही तर रक्त देणारे ढेकूण आहोत, असल्याचे सांगत मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ठाकरे गटाचे (Thackeray Sena) प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिलीच सभा कोकणातील खेड (Khed) येथे झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, बाळासाहेब ही त्यांची स्वतःची प्रॉपर्टी नाही, मान्य आहे ते त्यांचे वडील आहेत, पण ते या देशाची आणि हिंदू समाजाची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे त्यांचं नाव कुणीही वापरेल. महापुरुषांचे फोटो, नाव वापरणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. असे सांगत उद्धव ठाकरेंनी खेडच्या सभेत शिंदे गटावर केलेल्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, बाळासाहेबांच्या नाव वापरू नका, हे पाचव्या सहाव्या वेळेस झालंय, त्यामुळे त्या गोष्टीला किती धार द्यावी हे मला तरी वाटतं चुकीचं होईल. महापुरुषांचे फोटो, नाव वापरणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. बाळासाहेब ही त्यांची स्वतःची प्रॉपर्टी नाही, मान्य आहे ते त्यांचे वडील आहेत, पण ते या देशाची आणि हिंदू समाजाची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे त्यांचं नाव कुणीही वापरेल. उद्धव ठाकरेंसोबत मी 35 वर्षे राहिलो आहे, त्यांचे शब्द प्रयोग मला माहिती असून आम्ही रक्त पिणारे नाही तर रक्त देणारे ढेकूण आहोत, असे गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तरात म्हटले आहे.
तर मंत्री पाटील यांनी होळीच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे की, होळीच्या दिवशी आपण रागाच्या, दुःखाच्या, सगळ्या गोष्टी होळीत टाकत असतो. आज आपल्याला मागच्या सगळ्या गोष्टी विसरायच्या आहेत. बुरा न मानो होली है, म्हणत मी माझ्या मित्रांना आणि विरोधकांना होळीच्या शुभेच्छा देतो. विचारांची ही लढाई आहे. या लढाईत फरफटत गेलेला विचार हा यशस्वी शिखरापर्यंत नेत नाही. मूळ बेस आपला हिंदुत्व आहे, तो बेस सोडल्यामुळे हा प्रोब्लेम उभा राहिला आहे. तरी पण होळीच्या दिवशी वाईट बोलण्याची मानसिकता नाही. ठाकरे गटाला आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना होळीच्या शुभेच्छा देत मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला.