Igatpuri Kasara Railway : कसारा ते इगतपुरी (Kasara To Igatpuri) दरम्यान चौथी आणि पाचवी रेल्वेलाईन (Railway) टाकण्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या (Railway Ministry) वित्त संचालनालयाने 8 कोटी 70 लाख रूपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. त्यामुळे आणखी दोन रेल्वेलाइन आणि बोगदयाच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकर पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार गोडसे (MP Hemant Godse) यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी-कसारा नव्या रेल्वे लाईन साठी मागणी होती. नाशिक इगतपुरीहून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ही मागणी जोर धरत होती. अखेर गोडसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. नाशिकरोड (Nashik) ते मुंबई हा प्रवास जलदगतीने होण्यासाठी इगतपुरी - कसारा या दरम्यानच्या घाट क्षेत्रात सर्वच रेल्वेगाड्या कमी वेगाने धावतात. तसेच सिग्नल मिळत नसल्याने त्यांना सक्तीचा थांबा घ्यावा लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी कसारा ते इगतपुरी या दरम्यान चौथी आणि पाचवी रेल्वेलाईन टाकण्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वित्त संचालनालयाने आठ कोटी सत्तर लाख रूपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे दोन नवीन रेल्वेमार्ग आणि बोगदयाच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकर पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.
कसारा - इगतपुरी दरम्यानचा रेल्वेमार्ग घाट परिसरात आहे. सध्या या मार्गावर तीन रेल्वे लाईन आहेत घाट परिसर असल्याने सर्वच रेल्वेगाड्याना बँकर लावण्याची गरज पडते. आधीच घाट परिसर त्यात बॅकर लावण्यासाठी जाणारा वेळ यामुळे मुंबईहून मध्यरेल्वे मार्गे जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाडया उशिराने धावत असतात. यातूनच कसारा - इगतपुरी या घाट परिसरात अत्याधुनिक यंत्र सामुग्रीच्या साह्याने नवीन बोगदा आणि चौथी आणि पाचवी नवीन रेल्वेलाईन टाकावी यासाठी खासदार गोडसे यांचा रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू होता, त्याला आता यश आले आहे. चौथी आणि पाचवी रेल्वेलाईन सुमारे 32 किलोमीटरची असणार आहे. यापूर्वी सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम सुरू होईल. नवीन बोगदा व लाइनमुळे मुंबईहून देशभरात मध्यरेल्वे मार्गाहून धावणाऱ्या 100 रेल्वे विना अडथळा धावू शकणार आहेत.
32 किंलोमीटरची रेल्वेलाईन
कसारा ते इगतपुरी या दरम्यान टाकण्यात येणारी चौथी आणि पाचवी नवीन रेल्वेलाईन सुमारे 32 किलोमीटरची असणार आहे. यापूर्वी या रेल्वेमार्ग आणि बोगद्याच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झालेले असून आता हा निधी मंजूर झाल्याने, सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम देखील तात्काळ सुरू होणार आहे. प्रस्तावात कसारा ते इगतपुरी दरम्यान नवीन बोगदा आणि दोन रेल्वे लाईन प्रस्तावित असल्याने भविष्यात मुंबईहून देशभरात मध्यरेल्वे मार्गाहून धावणाऱ्या शंभर रेल्वेगाड्या विना अढथळा धावू शकतील याकडे खासदार हेमंत गोडसे यांनी लक्ष वेधले आहे.