Chhagan Bhujbal : शिवसेनेचे (Shivsena) अधिकृत नोंदणी नसल्याने आमच्याकडे पक्ष चिन्ह नव्हतं. त्यासाठी राज्यस्तरावर किंवा केंद्रस्तरावर पक्ष नोंदणी असणे आवश्यक असते. माझगावच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) शिवसेनकडून निवडणूक लढविताना मशाल (Mashal Symbol) चिन्हांवर लढवली. अन निवडून आलो. त्यानंतर पुढच्या निवडणुकीत आम्ही मशाल चिन्हांवर निवडणूक लढवली आणि आमचा महापौर झाला, अशी मशाल चिन्हांबाबतची आठवण राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan BHujbal) यांनी सांगितली.  


केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह गोठवत ठाकरे गटाला 'शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे' (Shivsena Uddhav Balasaheb Thackray) असे पक्षाचे नाव मान्य करत ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले. याच पार्श्‍वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तत्कालीन ‘मशाल’ चिन्हावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माझगाव विभागातून निवडणूक लढवली होती. यांसह शिवसेनेत असताना त्यांनी मशाल चिन्हांपर्यंत कास गेलो, या आठवणींचा प्रवास उलगडून दाखविला. 


छगन भुजबळ म्हणाले कि, माझं वय 75 झालं म्हणजे जास्त वय झालं नाही. मी पहिल्या 10 ते 15 शाखा प्रमूख यांच्यातील एक होतो. डोंगरेपर्यंतचा भाग माझ्याकडे होता. दत्ता प्रधान शिवसेनेत आल्यानंतर त्यानीं वॉर्ड वाईज रचना केली. आमच्या निवडणूक ध्यानी मनी नव्हती. मुंबई महाराष्ट्रात आहे, माञ महाराष्ट्र मुंबईत नाही अशी परिस्थिती होती. त्यावेळीं पार्टी नोंदणी नसल्यामुळे आमच्याकडे अधिकृत चिन्हं नव्हतं. म्हणजे राज्यस्तरावर आणि केंद्रस्तरावर पक्ष नोंदणी करावी लागते. इंदिरा गांधी यांच्या हत्या झाली आणि त्यानंतर 2 महिन्याने विधान सभेची निवडणूक झाली. त्यावेळीं मी मशाल चिन्हं घेतलं होतं. मी स्वतः मशाल चिन्हं भिंतीवर काढायचो. वाघ चिन्ह काढणं कठीण होतं म्हणून मी त्यावेळीं मशाल चिन्हं घेतल. त्या निवडणुकीत मी शिवसेनेकडून एकटा निवडून आलो होतो. 


दरम्यन मशाल चिन्हावर निवडून आल्यानंतर महापालिकेत निवडणुक लढण्याचं ठरल आणि खास त्या निवडणुकीसाठी आम्हीं मशाल चिन्हं घेतलं. त्यावेळीं 74 नगरसेवक आमचे निवडून आले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मला महापौर केलं. त्यावेळीं मी एकमेव असा व्यक्ती होतो जो महापौर आणि आमदार होतो. निवडणूक निकाल लागला, मी एकटाच निवडून आलो. आमदार झाले होते, मात्र ते पोटनिवडणुकीत निवडून आले होते. त्यावेळी एकमेव आमदार मी झालो होतो. 


शिवसेनेची मशाल पेटणार
या निवडणुकीत शिवसेना उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. जड जाणार नाही, सहज निवडून येतील,  शिवसेना उद्धव ठाकरे याना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पाठींबा दिला आहे. नक्की ते निवडणुक जिंकतील. शिवसैनिक म्हणुन सध्या घडत असलेल्या गोष्टी त्रासदायक आहेत. केवळ वाद वाद सुरु आहे. मुंबई ते दिल्ली सतत वाद सुरू आहेत. बेळगाव कारवार साठी 69 शिवसैनिकांनी बलिदान दिलं होत. त्यावेळीं महाराष्ट्र पेटून उठला होता. शिवसेनेच्या नावाला आव्हानं देणं आणि ते नाव रद्द होतंय की काय अशी परिस्थीती निर्माण होणं हे मनाला क्लेश देणारे आहे. शिवसेना उभी करण्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले त्यानंतर हे असे वाद होत असतील ते चुकीचे आहे, शिवसैनिकांना त्रास देणारे असल्याचे ते म्हणाले.