Nashik Godavari : नाशिकमध्ये (Nashik) जुलै 2022 मध्ये गोदावरीला आलेल्या पुरामुळे पुन्हा एकदा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या (Reverfront Development) नावाखाली म्हणजेच (नदी किनाऱ्याचा विकास) परिणाम उघड झाले आहेत. मागील तीन दशकांचा विचार केल्यास नाशिकच्या गोदावरीला सुशोभित करण्यासाठी अनेक उपाय राबविण्यात आले असून यामुळे  विशेषत: गोदावरीत (Godavari) केलेल्या काँक्रिटीकरणामुळे 2008, 2016, 2019 आणि 2022 मध्ये वारंवार महापूर आल्याचे समोर आले आहे. 


नाशिकचे (Nashik) वैभव म्हणून ओळखल्या गेलेल्या गोदावरी (Godawari) नदीला आज पुजले जाते. नाशिककर मोठ्या भक्तिभावाने गोदा पूजन करतात. मात्र सध्याची अवस्था बघता गोदेला कुणी वाली उरलाय कि नाही? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. मागील गेल्या दोन दशकांमध्ये राज्याच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन (JNNURM), अटल मिशन फॉर रिजुवनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT) आणि आता सुरू असलेला स्मार्ट सिटी मिशन (SCM). दरम्यान आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीनं देखील गोड सुशोभीकरणासाठी करोडोंचा निधी वापरण्यात येत आहे. दरम्यान 1992 च्या कुंभमेळ्यात नाशिकमधील गोदावरीच्या पात्रातील बेसाल्ट बेडरोकचे खड्डे आणि निसरडे स्वरूप दुरुस्त करण्यासाठी काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले होते. 


एका दशकानंतर, 2003 च्या कुंभमेळ्याच्या आधी, सुशोभीकरणासाठी आणि पर्यटकांना नदी किनारी विहार करण्यासाठी गोदावरीच्या नदीकिनारी मोठ्या प्रमाणात पुन: कॉंक्रिटीकरण करण्यात आले. या व्यापक काँक्रिटीकरणामुळे केवळ नदीचे पर्यावरण नष्ट झाले नाही तर चार नैसर्गिक झरे असलेली 17 कुंडे (पाणी साठवण्यासाठी संरचना) बंद झाली. यामुळे नदीची रुंदी कमी झाली आणि तिचा नैसर्गिक जलप्रवाह बदलला. यामुळे पार्श्वभूमीची धूप झाली आणि आजूबाजूच्या भागात पूर येण्यास सुरवात झाली. गोदावरी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट उपक्रम JNNURM अंतर्गत आणण्यात आला होता, ज्यामध्ये शहर विकास आराखड्यातील महत्त्वाचा घटक म्हणून स्टॉर्म वॉटर ड्रेनेज होते. 


गोदावरी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या 60 कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यात काँक्रीट वॉकवे (2.5 किलोमीटर) बांधणे समाविष्ट होते. तथापि, 2008 मध्ये काँक्रिटीकरण-चलित मोठ्या पूरस्थितीमुळे हा मोठा प्रकल्प यशस्वी होऊ शकला नाही. जो शहरातील सर्वात भीषण पुरापैकी एक मानला जातो. पायाभूत सुविधांच्या विकासाचे ध्येय आणि योजना देखील शहराला लक्षणीय दिलासा देण्यात अपयशी ठरली. शहराने, उदाहरणार्थ, JNNURM अंतर्गत 300 किलोमीटर ड्रेनेज स्थापित करण्यासाठी आणि AMRUT अंतर्गत सीवरेज ट्रीटमेंट प्लांटच्या बांधकामासाठी अंदाजे 400 कोटी रुपये खर्च केले. मात्र एकही प्रकल्प शहरासाठी फायद्याचा ठरला नाही. याचे कारण असे आहे की स्ट्रॉमवॉटर आणि सीवरेज ड्रेनेज वेगळे केले गेले नाहीत आणि नियोजनकर्त्यांनी शहराच्या नैसर्गिक पृष्ठभागाच्या भूरूपशास्त्राकडे दुर्लक्ष केले. यामुळे पाणी तुंबणे आणि तुरळक पूर येण्याच्या घटना घडल्या. आणि त्या आजही घडत आहेत. 


सुशोभीकरणाच्या धडाका 
विशेष म्हणजे, मुख्य शहरातील सीवरेज इन्फ्रास्ट्रक्चर पवित्र राम कुंडाच्या 500 मीटरच्या आत सोडत आहे आणि घाटाला प्रदूषित करत आहे. 2013 मध्ये, रिव्हरफ्रंटचा विकास निधीच्या कमतरतेमुळे रिलायन्स इंडिया फाउंडेशनकडे सोपवण्यात आला. कंपनीने 2014 मध्ये गोदा पार्कचा जवळपास 500 मीटरचा भाग विकसित करण्यास सुरुवात केली. 2015 च्या कुंभमेळ्याच्या आधी पुन्हा एकदा घाटाचे काँक्रिटीकरण आणि पुनर्विकास करण्यात आला. काँक्रिटीकरणाचे परिणाम 2016 च्या मान्सूनपूर्व दुष्काळात दिसून आले, जेव्हा नदी कोरडी पडली आणि काँक्रीट नदीचे पात्र उघड झाले. नंतर पावसाळ्यातही शहरात विनाशकारी पूर आला. मुसळधार पावसाबरोबरच नदीपात्राचे काँक्रिटीकरण आणि गोदा घाटाच्या सभोवतालच्या मोठ्या मलनिस्सारण ​​यंत्रणेचा संगम ही प्रमुख कारणे असल्याचा दावा स्थानिक गोदावरी संवर्धन समितीने केला आहे.