Nashik News : नाशिक (Nashik) येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या (Ded Collage) मुलींच्या वसतीगृहाकरिता (Ladies Hostel) भाडे तत्त्वावर जागा देण्यासंदर्भात करार करण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabainet Meeting) निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते.
नाशिक (Nashik) येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वस्तीगृहासाठी भाडेतत्त्वावर जागा देण्यासंदर्भात करार करण्यासाठी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. नाशिक येथे मुलींचे शासकीय वस्तीगृहाच्या जागेत आहे. त्या जागेतील 2485 चौरस मीटर क्षेत्र वस्तीगृहाच्या म्हणजेच शासनाच्या ताब्यात आहे. या ठिकाणी वस्तीगृहाचे जेवढे क्षेत्रफळ आहे. तेवढे म्हणजे 1190 चौरस मीटर चटई क्षेत्राचे बांधकाम जमीन मालकाने करून द्यावे आणि त्यासाठी शालेय शिक्षण विभागास 582 चौरस मीटर इतकी जागा कायमस्वरूपी मालकी तत्त्वावर वर्ग करण्यात यावी, अशा स्वरूपाच्या काही अटी व शर्ती या कार्यात असणार आहे.
शासकीय अध्यापक विद्यालयाच्या (Government Ded Collage) मुलींच्या वस्तीगृहाचा गेल्या सात आठ वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नवीन वस्तीगृह बांधकामाला मान्यता मिळाली असून सध्याच्या वस्तीगृहाच्या क्षेत्रफळा इतकेच बांधकाम केले जाणार आहे. शहरातील जिल्हा परिषदेच्या पाठीमागे असलेल्या तसेच कलेक्टर ऑफिसच्या (Nashik Collector Office) समोर असलेल्या शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वस्तीगृहाची इमारत गेल्या अनेक वर्षांपासून मोडकळी झाली होती. जवळपास सात ते आठ वर्षांपासून नवीन इमारत मिळण्यासाठी या विद्यालयामार्फत प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना अखेर यश आले असून बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन वस्तीगृह बांधकाम बांधण्यावर शिक्का मुहूर्त करण्यात आले आहे.
मुलींना लवकरच नवीन वस्तीगृह
दरम्यान यासाठी भाडेतत्त्वावर करार केला जाणार असून 1190 चौरस मीटर चटई क्षेत्र बांधकाम संबंधित जमीन मालकाला करून द्यावे लागणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाला 582 चौरस मीटर जागा कायमस्वरूपी मालकी तत्त्वावर वर्ग करण्यात यावी यासह काही अटी ही घालण्यात आलेला आहेत या निर्णयामुळे अध्यापक विद्यालयाच्या मुलींना लवकरच नवीन वस्तीगृह मिळणार आहे. नाशिकमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण तसेच आदिवासी भागातील मुली अध्यापक विद्यालयात प्रवेश घेतात. या मुलींसाठी वस्तीगृही आवश्यक बाब आहे. सध्याचे वस्तीगृह मोडकळीस आल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यासह इमारतच सुस्थितीत नसल्यामुळे अन्य सुविधाही मिळण्यात अडचणी येत होत्या. कोरोना कालावधीत ऑनलाइन शिक्षणामुळे जवळपास दोन वर्षे वस्तीगृह बंद होते, परंतु यंदा प्रत्यक्ष शिक्षण सुरू झाल्यामुळे प्रवेश प्रक्रिया नंतर पुन्हा या विद्यार्थिनींसाठी वस्तीगृहाची गरज भासणार आहे. त्यामुळे नवीन वस्तीगृहाच्या बांधकामाला मिळालेली मान्यता या विद्यार्थिनींसाठी लाभदायक ठरणार आहे.