Nashik Cylinder Blast : आज सकाळपासून अपघाताच्या मालिकेने नाशिक (Nashik) शहरासह जिल्हा हादरला आहे. औरंगाबाद रोड त्यानंतर सप्तशृंगी गड आणि आता मनमाडनजीक गॅस सिलेंडर (Gas Cylinder) घेऊन जाणारा ट्रकला आग लागून भयंकर स्फोट झाला आहे. स्पोट इतका भीषण होता कि, ट्रकमधील सिलेंडर हवेत रॉकेटसारखे फेकले गेले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. 


नाशिकमध्ये आज सकाळी औरंगाबादरोडवर असलेल्या मिरची हॉटेलजवळ भीषण तिहेरी अपघात (Nashik Bus Fire) झाला. या अपघातात बारा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यानंतर सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Gad) एसटी महामंडळाच्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर आता गॅस सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक उलटून भीषण आग लागल्याची घटना मनमाडनजीक घडली आहे. पुणे -इंदूर महामार्गांवर झालेल्या या अपघातात सिलिंडर्स रॉकेटसारखे हवेत उडत होते. सिलेंडरचे स्फोट होत असल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे किलोमीटर अंतरावर रोखून ठेवण्यात आली होती. त्यामुळे पुणे-इंदूर महारमार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. 


मनमाड पासून जवळ पुणे -इंदौर महामार्गांवर गॅस सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक पलटी होऊन त्यात आग लागल्याची घटना घडली. दरम्यान ट्रकला आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फ़ोट होत असल्यामुळे आगीची तीव्रता वाढली. तसेच वेळीच घटना लक्षात आल्यामुळे या मार्गांवरील वाहतूक 2 किमी लांब रोखून धरण्यात आली आहे. ट्रक मध्ये गॅसने भरलेले सुमारे 200 सिलेंडर असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले मात्र सिलेंडरचे स्फ़ोट होत असल्यामुळे तेथे जाण्यास अडचण येत आहे. अपघातात चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


रॉकेटसारखे उडाले सिलेंडर 
चांदवड तालुक्यातील कानडगाव शिवारात मनमाड- मालेगाव रोडवर आज हायड्रोजन सिलिंडर घेऊन जाणारा ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक रस्त्याचे बाजूने असलेल्या नाल्यात उलटला. त्यात आग लागून सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये ट्रकमध्ये गॅसने भरलेले सुमारे २०० सिलेंडर असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर ट्रकमधील इतरही सिलेंडर धडाधड हवेत उडू लागल्याने रस्त्यावरून जाणाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. घटनेची माहिती मिळताच मनमाड अग्निशमन दलाचे मदतीने पोलिसांनी आटोक्यात आणली आहे. मात्र या स्फोटांच्या आवाजांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.