Nashik Gad Bus Fire : नाशिक (Nashik) मध्ये पहाटेच्या सुमारास बसचा भीषण अपघात (Nashik bus Fire accident) झाल्यानंतर या दुर्घटनेत बारा जणांना जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रशासनाला सूचना देत पुढील कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यांनतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये येऊन घटनास्थळी पाहणी केली असून त्यानंतर त्यांनी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. 


आज पहाटेच्या सुमारास नाशिक शहरातील औरंगाबाद रोडजवळील मिरची हॉटेल परिसरात बसचा भीषण अपघात झाला. ट्रक आणि खाजगी ट्रॅव्हल्स या दोन वाहनांत अपघात होऊन ट्रॅव्हल बसला भीषण आग लागली. पहाटेची वेळ असल्याने अनेकांना मृत्यूने गाठलं. काही वेळेतच ही बस जळून खाक झाली. दरम्यान मुख्यमंत्र्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतरप्रशासनाला सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश देऊन ते नाशिकला दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली. त्याचबरोबर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची विचारपूस केली. तसेच उपस्थित मृतांच्या नातेवाईकांना आधार देत मदत जाहीर केली आहे. 


यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित असून परिस्थितीही पाहणी केली जात आहे. स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडून अपघाताची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून नेमका अपघात कसा झाला कुठे झाला? अपघाताची कारणं काय? या सर्वांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधिकारी, जिल्हा प्रशासनाकडून घेतली आहे. प्रत्यक्ष घटनास्थळावर येऊन मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण तपशील जाणून घेत आहेत. 


दादा भुसे म्हणाले की, नाशिकची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सध्या शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. जखमींना उपचाराला प्राधान्य देण्यात येणार आहे. अपघाताची सखोल चौकशी करण्यात येईल, मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिलेले आहेत. उपचारासाठी खासगी रुग्णालयांचीही मदत घेण्यात येईल. मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आली आहे. याचबरोबर छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, शरद पवार यांनी देखील घटनेसंर्दभात शोक व्यक्त करीत घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. 


मृतांना पाच लाखांची मदत 
नाशिकमध्ये बस अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शोक व्यक्त केला. त्याचबरोबर नाशिकमध्ये दाखल होत त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. तत्पूर्वीच नाशिकमध्ये दाखल होण्यापूर्वी सकाळी अपघाताची माहिती त्यांनी जिल्हाधिकार्यांकडून घेतली होती. त्यावेळी जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. कोणत्याही परिस्थितीत जखमींवर चांगले उपचार झाले पाहिजेत. उपचारात काही कमी पडू नयेत अशा सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होत. तसेच या अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.