Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील औरंगाबाद रोडवर (Aurangabad Highway) यवतमाळ मुंबई बसला अपघात होऊन बारा प्रवाशांचा बळी गेल्यानंतर आता शहरातीलच नव्हे तर राज्यातील ब्लॅक स्पॉट (Black Spot) बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी गंभर दखल घेतली असून त्यांनी या संदर्भात उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार ब्लॅकस्पॉट ठरलेल्या मिरची चौफुली (Mirchi Chuafuli) चौकात उड्डाणपूल बांधण्याची सूचना केल्याचे प्राथमिक माहिती आहे.
नाशिकमध्ये बस दुर्घटना झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शहरातील ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील ब्लॅक स्पॉटबाबत मनपा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत त्या त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात आले आहेत तर 12 जणांचा बळी घेणाऱ्या मिरची चौकात देखील आता उपाययोजना करण्यात येऊन या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते. नाशिक महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नाशिक शहरातील अपघात स्थळी म्हणजेच मिरची चौकात राष्ट्रीय महामार्ग विभागाने उड्डाणपूल बांधण्याची सूचना केली असून या विभागांनी देखील ती मान्य केली आहे. तर दुसरीकडे महापालिकेने या चौकातील बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे हटवण्यासाठी मंगळवारचा मुहूर्त जाहीर केल्यानंतर हातोडा पडण्याच्या आतच हा चौक अतिक्रमण मुक्त झाला आहे.
नाशिकच्या मिरची चौकात खाजगी बसला अपघातानंतर लागलेल्या आहेत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर काही तासांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या ठिकाणी येऊन पाहणी केली होती. त्यावेळी आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या चौकात उड्डाणपुलाची गरज असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री शिंदे आणि राज्यातील अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणाली द्वारे बैठक घेतली. यात ब्लॅक स्पॉट बाबत चर्चा करण्यात आली. त्यात पुन्हा एकदा आयुक्त पुलकुंडवार यांनीया संदर्भात सूचना केली. तसे पत्र राष्ट्रीय महामार्ग विभागाला अगोदरच पाठवले आहे. मिरची चौकाचा महामार्ग असला तरी त्याबाबत शासनाचे अधिसूचना अद्याप प्राप्त झाले नाही. ती हाती पडताच कार्यवाही करण्याचे प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांचे म्हणणे असल्याचे डॉ. पुलकुंडवार सांगितले.
व्यावसायिकांनी अतिक्रमणे हटवली!
दरम्यान मिरची चौकाच्या धरतीवर नांदूर नाकांनी सिद्धिविनायक लॉन्स चौकातही सुधारणा केली जाणार आहे शहरातील ब्लॅक स्पॉट बाबतही लवकरच कार्यवाही केला जाणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. यांनी देखील संबंधित ठिकाणांची पाहणी करून लवकरात लवकर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक महापालिकेने अपघातानंतर मिरची चौकात अनेक सुधारणा केल्या आहेत. या चौकातील बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे करणाऱ्यांना मनपाने नोटीस बजावल्या होत्या. त्यानुसार या चौकातील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. जवळपासची हॉटेल दुकाने यांच्यावर हातोडा पडण्यापूर्वी संबंधित दुकान मालकांनी बांधकामे काढली आहेत. त्यामुळे आता रस्त्याच्या रुंदीकरण कामाला लगेच सुरुवात होणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. जे व्यावसायिक बांधकाम हटवणार नाहीत त्यांची अतुक्रमाणि हटून कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे.