Nashik Latest Marathi News Update: नाशिक शहरासह जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण नवीन वर्षातही कायम आहे. जिल्ह्यातील एका ग्रामसेवकास सहाशे रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे ग्रामपंचायतीत लाच स्वीकारल्याची घटना समोर आली आहे. नाशिक शहरात आणि जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी वाळवी लागली की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना उपस्थित होतो आहे. एकीकडे सर्वसामान्य माणूस मोठ्या आशेने या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांकडे काम घेऊन जात असताना अशा प्रकारे काम करवून देण्यासाठी पैशांची मागणी करत असतील तर लाजिरवाणी गोष्ट आहे. अशातच मयत आईच्या मृत्यू बाबतची नोंद करून मृत्यू प्रमाणपत्र बनवून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून सहाशे रुपये लाचेची मागणी करणाऱ्या श्रावण वामन वाघचौरे, ग्रामसेवक वर्ग 3  ग्रामपंचायत कार्यालय पिंपळनारे अतिरिक्त कार्यभार ग्रुप ग्रामपंचायत रामशेज आशेवाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यास अटक करण्यात आली.


दरम्यान या प्रकरणातील तक्रारदार यांच्या मयत आईची मृत्युची नोंद ग्रामपंचायत कार्यालय येथे करून प्रमाणपत्र बनवुन दिल्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणून लाच मागण्यात आली होती. ग्रामसेवक श्रावण वामन वाघचौरे यांनी तक्रारदार यांच्याकडे सहाशे रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिली. सदर तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा रचून  कारवाई करण्यात आली आहे. ग्रामसेवकाने सहाशे रुपये लाचेची रक्कम स्विकारल्याने भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 


संबंधित ग्रामसेवकाने पिंपळनारे येथील प्रशासकीय कार्यालयातील ग्रामसेवक कक्षात स्विकारल्याने त्यांना पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध  गुन्हा नोंदविण्याची आला आहे. मात्र ही घटना घडली, एसीबीने कारवाई केली, मात्र तरीदेखील यात बदल होणार नाही. अशाच पद्धतीने पुन्हा कुणी अधिकारी, कुणी कर्मचारी लाच प्रकरणात अडकेल, हे निश्चित. यास लगाम कधी लागणार हा प्रश्न न सुटणारा असल्याचे एकूण घटनांवरून दिसून येत आहे. 


तक्रार करण्याचे आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक तर्फे नागरीकांना आवाहन करण्यांत येते की, कोणत्याही शासकीय कार्यालयातील कर्मचारी किंवा अधिकारी कोणी लाच मागत असेल तर महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या सोईच्या दृष्टीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तकार करता येणार आहे. यासाठी लँडलाईन ते लॅन्डलाईन व मोबाईल ते लॅन्डलाईन अशी टोल फ्री नंबर 1064 ची सेवा सुरु करण्यांत आली असून सदर क्रमांकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यप्रणालीसंबंधी व करावयाच्या तकारीसंबंधी नागरीकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.