Nashik News : मद्य पिऊन (Liquor) महिलेने एसटी बसमध्ये (ST Bus) धिंगाणा घातल्याचा प्रकार नाशिकच्या (Nashik) इगतपुरी बस आगारात (Igatpuri) समोर आला आहे. इगतपुरीहून निघालेल्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका तर्राट महिलेने गोंधळ घातल्याने बसमधील प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे या महिलेच्या गोंधळाचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झाला आहे.
राज्यपाल लाखो नागरिक आजही लालपरीने प्रवास करतात. तर नाशिकच्या ग्रामीण भागात आज एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र याच एसटी मध्ये प्रवास करणाऱ्या एका मद्यपी महिलेने धुडगूस घालून चालक, वाहकांसह प्रवाशांना वेठीस धरले. यामुळे प्रवाशांना तर मनस्ताप झालाच शिवाय नंतर चालक वाहकांनी बस थेट पोलीस ठाण्यात नेली. तिथेही महिलेने गोंधळ घालून पोलिसांचाही नाकात दम आणला. शेवटी पोलिसांनी संबंधित महिलेला समजावून सांगत तिला सोडून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिकच्या बसस्थानकांतून सहाशेहून अधिक बसेस विविध मार्गावर धावतात. शिवाय हजारोंच्या संख्येने नागरिक प्रवास करतात. मात्र काल सायंकाळी घोटी बस स्थानकातून शेणीत पेहिरेकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये एका महिलेने दारू पिऊन धिंगाणा घातला. नशेत टुल्ल असलेल्या या महिलेनं बसमधील प्रवाशांना तसेच चालकांना चांगलाच त्रास दिला. चालक वाहकांसह प्रवासी संतापल्याने बस पेहीरेकडे न जाता थेट पोलीस ठाणे गाठून सदर प्रकार पोलिसांना सांगितला.
व्हिडीओ झाला व्हायरल
दरम्यान बसमध्ये गोंधळ घालणाऱ्या या महिलेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला झाला आहे. विशेष म्हणजे श्रावण संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर या प्रकाराची चांगलीच चर्चा रंगू राहिली आहे. अनेक मिम्स देखील यावर तयार करण्यात आले आहे. सोशल मीडियावर शेअर देखील केले जात आहे.
नेमकं काय घडलं?
काल सायंकाळी नाशिकच्या (Nashik) घोटी बसस्थानकांवरून पेंहिरे या गावाला जाण्यासाठी बस कंडक्टरने घंटी वाजविली. तशी बस घोटी स्थानकातून मार्गस्थ झाली. मात्र बस निघाल्यानंतर वेगळाच प्रकार समोर आला. या बसमध्ये मद्य पिऊन टूल असलेली एका महिलेने चांगलाच गोंधळ घातला. हि महिला गाडीत उभी राहत धिंगाणा घालत असल्याचे पाहून इतर प्रवाशांसह वाहकांने त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न निष्फळ ठरला. मात्र महिलेने कोणाचीही ऐकता गोंधळ घालण्यास सुरूच ठेवला. शेवटी बस नजीकच्या पोलीस ठाण्यात गेली, मात्र इथंही या महिलेने गोंधळ घालत पोलिसांना जेरीस आणले.