Nashik Crime : गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरात अमली पदार्थांच्या (Drugs) सेवनाचे प्रमाण वाढत चालले असून यामुळे शहरातील तरुण मुले देखील ड्रग्सच्या विळख्यात सापडली आहे. नाशिकच्या गल्ली बोळात, शाळा, टपरीवर अमली पदार्थांची विक्री करण्यात येत असल्याचे सांगत पोलीस यंत्रणेला धारेवर धरले. आमदार देवयानी फरांदे यांनी देखील जिल्हा नियोजन बैठकीत आवाज उठवत लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले.


नाशिक शहरात गुन्हेगारी (crime) दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिकाधिक दिसून येत आहे. विशेष म्हणजे शहरात वाढलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीतून लहान मुलांपर्यंत सेवन होत असल्याने साखळी वाढत चाललंय आहे. अशातच अमली पदार्थांच्या सेवनातून गुन्हेगारी कारवाया वाढत असून आत्तापर्यंत ड्रग्सच्या आहारी गेलेल्या तीन तरुणांनी आत्महत्या केल्याचा आरोपही फरांदे यांनी यावेळी केला. दरम्यान शहरात हे ड्रग्स कुठून येते? त्याचा पुरवठा कोण करतं? लोकप्रतिनिधींना त्याची खबर कशी लावू शकत नाही? पोलीस यंत्रणा यावर काय उपाययोजना करत आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी यावेळी केली. या संदर्भात आपण पोलीस आयुक्तांना पत्र दिले असून शहरातील तरुणाई व्यसन पासून वाचविण्याची कळकळीची विनंती केल्याची त्या म्हणाल्या. 


नाशिक शहरातील पान टपरी गल्लीबोळ विशेष विशिष्ट ठराविक भागात रिक्षातून मालपुरवठा केला जातो पंचवटीत तर एका शाळेबाहेरच महिला ट्रक विक्री करत असल्याचे धक्कादायक वास्तव काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यामुळे शहरातील तरुणही अमली पदार्थांच्या विळख्यात सापडले असून लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे असा सवाल करत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार देवयानी फरांदे यांनी अमली पदार्थ विक्रीची पोलखोल केली. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला वाचवण्यासाठी पोलिसांनी हेल्पलाइन सुरू करण्याची त्यांची मागणी तात पालकमंत्री भुसे यांनी मान्य केली दरम्यान शहरात ठीक ठिकाणी अमली पदार्थांचे विक्री केली जात असून दोन दिवसांपूर्वी दहावीत शिक्षण घेत असलेल्या एका पालकाला आपल्याला फोन आला व त्याने आपल्या मुलाला अमली पदार्थाच्या आहारी गेल्याची तक्रार केली असे सांगून अनेक टपऱ्यांवर ट्रकची खुले विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इंदिरानगर वडाळा रोडवर रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत अमली पदार्थ सेवनासाठी मोठ्या प्रमाणावर तरुण एकत्र येत असल्याचे निदर्शनास येत आहे. 


शिवाय अनेक शाळांच्या बाहेर त्याची विक्री केली जात असून शाळेतील मुले या विळख्यात सापडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या पार्शवभूमीवर पोलिसांसह प्रशासनाने तातडीने पाऊले उचलण्याची गरज असून शहर ड्रग्सच्या विळख्यात जाण्यापूर्वी रोखणे महत्वाचे असल्याचे फरांदे यांनी सांगितले. तसेच पालकांना याबाबत तक्रार करायची असेल तर स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान या मागणीनंतर पालकमंत्री भुसे यांच्या सूचनेवरून पोलिसांच्या 112 क्रमांकावर अमली पदार्थांच्या विरोधात तक्रार करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांनी केले. त्याशिवाय ऑनलाइन देखील नागरिक तक्रारी केल्यानंतर पोलिसांकडून त्याची दखल घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.