Nashik News : नाशिकच्या व्हीएन नाईक कॉलेजात शिक्षण संस्था अध्यक्षांच्या मुलाने राडा घातल्याची घटना घडली आहे. यामुळं महाविद्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण  निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.


नाशिकमधील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानाजवळ असलेल्या क्रांतीवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेत हि घटना घडली आहे. शहरासह जिल्ह्यात या संस्थेचा नाव लौकिक आहे. येथे महाविद्यालयीन शिक्षणासह, इतर कोर्सेस असल्याने अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून पंढरीनाथ थोरे (VN Nike Education Institute) हे काम पाहतात. 


झाले असे की, संस्थेचे अध्यक्ष असलेले पंढरीनाथ थोरे यांच्या सुनबाई देखील या कॉलेजात शिक्षण घेतात. दरम्यान संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमात गोंधळ झाला. यामध्ये अध्यक्षांच्या सुनबाई आणि इतर विद्यार्थिनींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले. यावेळी थोरे यांच्या सून बाईंनी प्राचार्य, प्राध्यापक यांच्या कानावर न घातला हि बाब थेट त्यांचे पती आदित्य थोरे यांना सांगितले. प्राचार्याच्या व स्टाप च्या मदतीने महाविद्यालयात मिटवण्यात येत होता मात्र तत्पूर्वी संस्थेच्या अध्यक्षांचे सुनबाई यांनी त्यांचे पती आदित्य थोरे यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला व महाविद्यालयात बोलवून घेतले. 


यानंतर आदित्य थोरे यांनी महाविद्यालयात येत झालेल्या प्रकाराबाबत प्राचार्य व प्राध्यापकांचे चर्चा न करता अपशब्द वापरले. शिक्षकेतत्तर, कर्मचारी यांना अरेरावी करत शिवीगाळ करून गोंधळ घातला. तसेच अपमानास्पंद वागणूक दिल्याची तक्रार संस्थेचे चिटणीस अ‍ॅड. तानाजी जायभावे (Adv Tanaji Jaybhave) यांनी संस्था प्रशासनाकडे तर, संचालक अ‍ॅड. जयंत सानप (Adv Jayant Sanap) यांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे केली आहे.


दरम्यान आदित्य थोरे यांनी यावेळी 'ही संस्था माझ्या बापाची आहे, तुम्ही मला ओळखलं नाही का? असा प्रश्न उपस्थित प्राध्यापकांना केला. तसेच अर्वाच्च भाषेत वाद घालत संबंधित विद्यार्थिनीला परीक्षेत नापास करा? अशा प्रकारचा गोंधळ घालून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संस्थेशी संबंधित नसलेल्या व्यक्तीने संस्थेत येत केलेले सदर कृत्य योग्य नसून चुकीचे आहे. यामुळे प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी वर्गात दहशत पसरली आहे. तरी, आदित्य थोरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.


जायभावेंनी केली तक्रार 
आपली संस्था आणि सामाजिक संस्था असून संस्थेच्या घटनेनुसार दर पाच वर्षांनी संस्थेचे सभासद कार्यकारणी मंडळ असंच निवडून देतात. अशा प्रकारे महाविद्यालयांमध्ये संस्थेच्या अध्यक्षाच्या मुलाने संस्थेची काही संबंध नाही, अथवा कुठल्याही पदावर नाही, फक्त वडील संस्थेचे अध्यक्ष आहे, याचा गैरफायदा घेऊन असे बेजवाबदार गैरकृत्य करणे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे आदित्य थोरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संस्थेचे सरचिटणीस तानाजी आप्पा जायभावे यांनी केली आहे.