Nashik Trimbakeshwer Yatra : 'राम कृष्ण हरी, जय हरी विठ्ठल नामाचा गजर करत वारकऱ्यांच्या दिंड्या त्र्यंबक नगरीत दाखल झाल्या असून त्र्यंबकनगरीसह परिसर वारकऱ्यांनी फुलून गेला आहे. भगव्या पताका, हाती टाळ मृदुंगाच्या तालात त्र्यंबकनगरी दुमदुमली आहे. त्र्यंबक नगरीत दाखल होणाऱ्या दिंडीचे नगरपालिका प्रशासनासह नागरिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.


त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी (Sant Nivruttinath Mandir) संस्थांच्या वतीने सोमवारपासून 21 जानेवारीपर्यंत पौषवारी यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. 18 जानेवारी रोजी पहाटे चार वाजता शासकीय महापूजा होईल. महापूजेनंतर नगरपरिक्रमा होणार आहे. यावेळी श्री त्र्यंबकराज भेट आणि कुशावर्त स्नान होईल. उत्सवात सहभागी होण्यासाठी 500 हून अधिक दिंड्या त्रंबक नागरिक दाखल झाले आहेत. डोक्यावर तुळशी वृंदावन, माऊलीचा गजर विणेकरी टाळकरींचा अखंड नाद असं उत्साहपूर्ण भक्तीमय वातावरण त्र्यंबकनगर पाहायला मिळत आहे. आलेल्या बालकऱ्यांचं प्रशासनाकडून स्वागत करण्यात येत असून मानाच्या दिंड्या मानकरी आणि स्वयंसेवक यांना नारळ प्रसाद देत स्वागत करण्यात येत आहे. वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासनाचे वतीने पिण्याच्या पिण्यासाठी पाणी फिरते स्वच्छतागृह आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करुन दिले आहेत. 


नाशिक त्र्यंबक मार्ग वारकऱ्यांनी गजबजला


आज सकाळपासूनच नाशिक शहरासह त्र्यंबक शहरात ज्ञानोबा तुकारामचा जयघोष दुमदुमत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या समोर येऊन तेथे अभंग, ब्रह्मगिरीचे दर्शन घेत दिंडी मंदिर प्रांगणात पोहोचत आहेत. दोन दिवसांपासून नाशिक त्र्यंबक मार्ग भव्य पथक हाती घेऊन चालणाऱ्या वारकऱ्यांनी गजबजला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत नव्याने सुरु झालेल्या शंभरावर पाय दिंड्या शहरात मुक्कामी भोसल्या तर वर्षांवरचे येणारे बहुतेक दिंड्या शहरापासून पाच सहा किलोमीटर परिसरात विसावले आहेत. आज सकाळी त्यांचे त्र्यंबकच्या दिशेने मार्गक्रमण सुरु झालं तर असंख्य दिंड्यां ह्या त्र्यंबक शहरात पोहोचल्या. त्यामुळे शहरात त्र्यंबकमध्ये भाविकांची गर्दी झाली असून ज्ञानोबा माऊलीचा जयघोषाने त्र्यंबक नगरी दुमदुमली आहे.


दोन वर्षांनंतर वारी 


त्र्यंबकेश्वर कोरोनामुळे दोन वर्ष संत निवृत्तीनाथांच्या वारीला ब्रेक लागला होता. मात्र यंदा मोठा उत्साह असून संत निवृत्तीनाथांच्या पौष वारीसाठी प्रशासनाची तयारी सुरु आहे. यासाठी राज्यभरातून मानाच्या दिंड्यांसह पायी दिंड्यांनी त्र्यंबकेश्वर शहरात आगमन केला आहे. त्यामुळे सगळीकडेच भगव्या पताका, वारकरी मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. त्र्यंबक नगरीचे रस्ते वारकऱ्यांनी गजबजले असून सगळीकडे हरिनामाचा गजर दुमदुमत आहे. रस्त्याने महिला, पुरुष वारकरी हातात टाळ, मृदुंग, झेंडा, तुळशीवंदन घेऊन त्र्यंबक नगरी गाठत आहेत.