Nashik Cyber Attack : नाशिक महानगर (NMC) पालिकेची संगणक प्रणाली (Computer) हॅक करून डेटा (Data) चोरी करण्याचा एका अमेरिकन हॅकर्सचा (Hacker) प्रयत्न सुरू होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) संगणक प्रणालीमध्ये व्हायरस शिरला होता. त्यानुसार अमेरिकन हॅकर्सने (American Hackers) डेटा चोरी करण्याचा प्रयत्न होता असे सायबर पोलीसांच्या तपसानंतर समोर आले आहे. 


नाशिक मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांनी याबाबत कुठलीही वाच्यता न होऊ देता पालिकेचा डेटा सुरक्षित ठेवण्याची मोठी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. यामध्ये नाशिक महानगर पालिकेच्या आयटी विभागाने केलेली कारवाई कौतुकास्पद असल्याचे देखील समोर आले आहे. नाशिक महानगर पालिकेच्या संगणक प्रणालीमध्ये व्हायरसने अटक केल्याचे समोर आले होते. तब्बल 24 तास हा व्हायरस डेटा चोरण्याचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान प्रशासनाला ही बाब लक्षात येताच अमेरिकन हॅकर्स असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान अमेरिकन हॅकर्स चा हल्ला पार्टवरून लावण्यासाठी नाशिक महापालिका प्रशासनाचा आयटी विभाग कामाला लागला. आयटी विभागाने सर्व शक्यता पडताळून काही तासांच्या अथक प्रयत्नाने सायबर हल्ला परतवून लावला आहे. 


नाशिक महानगर पालिकेच्या हद्दीतील नागरिक, कर्मचारी आणि पालिकेचा इतर डेटासह संगणक यंत्रणाच ठप्प करण्याचा प्रयत्न हॅकर्सकडून सुरू होता. फायर वॉलवर सतत चोवीस तास त्रस्त करणाऱ्या हॅकरला पळवून लावण्यात पालिकेच्या आयटी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. यामध्ये संगणक नेटवर्कमध्ये व्हायरस शिरल्याने संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली होती. त्यानुसार ग्लोबल आयपी ॲड्रेस तपासणीनंतर अमेरिकन हॅकर असल्याचे लक्षात आले आहे.


नाशिक मनपाच्या एकूण 43 विभागांमधील संपूर्ण माहितीचे डिजिटायझेशन सुरू असून हा डाटा सुरक्षित करण्यात आला आहे. यासाठी स्वंतत्र आयटी विभाग निर्माण करण्यात आला. आयटी विभागाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाते. सोबतच महापालिकेच्या वेबसाइटची सुरक्षा करण्यासह ऑनलाइन विभागाच्या तक्रारींचे वर्गीकरण करण्याचे काम आयटी विभागाकडून केले जाते. गेल्या आठवड्यात अमेरिकन हॅकर्सने संगणक नेटवर्कमध्ये व्हायरस पाठवत, संगणकीय यंत्रणा ठप्प केली होती. मात्र, दक्ष असलेल्या आयटी विभागाने 24 तास व्हायरसची लढा देऊन हल्ला परतवून लावला. 


दरम्यान या विषावर सायबर फॉरेन्सिक सायबर तज्ञ तन्मय दीक्षित म्हणाले कि, वेबसाईट आणि डेटा स्टोअर असलेला सर्वर हा नेहमी दोन ते तीन स्टोरवरती बॅकअप करून ठेवणे आणि लाईव्ह अपडेट असणे आवश्यक आहे. महत्त्वाचा डेटा जर नकळत कुठल्याही ठिकायाहून एक्सेस केला जात असेल तर अशा वेळेस ते ठराविक आयपीएल ड्रेस यांना एक्सेस बंद देणे करणे आवश्यक आहे. सरकारी डेटा हा सुरक्षित असणं हे ठराविक शहरासाठी राज्यासाठी आणि देशासाठी सुद्धा महत्त्वाचे आहे कारण याचा कळत अथवा नकळत गैरवापर केला तर हाहाकार माजू शकतो. सायबर तज्ञ यांच्यामार्फत डेटा सिक्युअर कसा करून ठेवू शकतो हे लक्षात घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.