Nashik CM Eknath Shinde : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी संपादन केली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विद्यापीठाच्या वतीने वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदविका (Journalism) शिक्षणक्रमाचे प्रमाणपत्र कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार म्हणूनही ओळखले जाणार आहेत. 


सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक (Nashik) दौऱ्यावर येणार आहेत. आज ते एका खासगी कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये उपस्थित राहणार आहेत. सर्व देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. यांनतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली. त्यानंतर ते थोड्याच वेळात नाशिकला येणार आहेत. अशातच मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यानंतर ते नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (Maharashtra Open University) माजी विद्यार्थी असल्याची चर्चा सुरू झाली होती. यापूर्वी त्यांनी मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर आता त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण मुक्त विद्यापीठातून घेतले असून पत्रकारितेचा पदविका शिक्षणक्रम ऑगस्ट 2021 मध्ये विशेष प्राविण्यसह अर्थात 77.25 टक्के गुण मिळून पूर्ण केला होता. त्याचा पदवी प्रदान सोहळा मुंबईत पार पडला.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 77 टक्के गुणांसह यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पत्रकारिता पदविका प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांना वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदविका शिक्षण क्रमाचे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी हा पदविका अभ्यासक्रम ऑगस्ट 2021 मध्ये विशेष प्राविण्यसह अर्थात 77.25 टक्के गुण मिळवून पूर्ण केला होता. शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा येथे झालेल्या सोहळ्याप्रसंगी कुलगुरू पाटील यांचे समिती विद्यापीठाचे कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटू प्रसाद पाटील उपस्थित होते. यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि मुक्त विद्यापीठाची बीए पदवी विशेष प्राविण्यसह पूर्ण केली आहे. त्याचप्रमाणे मानवी हक्क प्रमाणपत्र शिक्षणक्रमही विशेष प्राविण्य सहज पूर्ण केला आहे.


विद्यापीठाच्या नाव लौकिकात भर 


महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नाव लौकिकात मुख्यमंत्री शिंदे यांच्या या यशाने भर पडली आहे. त्यांना प्रमाणपत्र देताना कुलगुरू म्हणून विशेष आनंद होत असल्याची प्रतिक्रिया कुलगुरू डॉ.पाटील यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच विद्यापीठातून अनेक शिक्षण उपक्रम पूर्ण केले आहेत. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या लवकर मुख्यमंत्री शिंदे यांच्या या यशाने भर पडले आहे. त्यांना प्रमाणपत्र देताना कुलगुरू म्हणून विशेष आनंद होत असल्याचे सांगत विद्यापीठाच्या नामवंताच्या नावांमध्ये मोठी भर पडल्याची प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. पाटील यांनी व्यक्त केली.