Nashik Bitco Hospital : सिंहस्थ कुंभमेळा (Kumbhmela) निधीतून बऱ्याच वर्षांपासून खरेदी केल्यानंतर बिटको रुग्णालयात (Bitco Hospital) धुळखात पडून असलेल्या सिटीस्कॅन व एमआरआय (MRI) मशीनचा वापर सुरू केला जाणार असून खाजगी रुग्णालयांच्या (Private Hospital) तुलनेत तीस ते चाळीस टक्के दर आकारून चाचण्या होणार आहेत. त्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मेडिकल कॉलेजच्या (medical Collage) धरतीवर दर निश्चिती करून दिल्लीतल्या स्टार इमॅजिन या कंपनीत पुढील आठवड्यापासून काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
नाशिकमध्ये (Nashik) अनेक सुसज्ज रुग्णालये असून कोरोना काळात (Corona Crisis) काही खाजगी रुग्णालयांनी मात्र याचा फायदा घेत नागरिकांनी लुबाडणूक केली. त्यामुळे अनेक गोर गरीब वर्ग हा आजही शासकीय रुग्णालयांच्या (Government Hospital) भरवशावर दाखल होत असते. अनेकदा मोठं मोठ्या चाचण्या करण्यासाठी रुग्णांकडे पैसे नसल्याने हेळसांड केली जाते. मात्र आता सिटी स्कॅन आणि एमआरआय सारख्या चाचण्या कमी पैशांत होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे. सन 2014-15 मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिटीस्कॅन व एमआरआय मशीन खरेदीसाठी निधी आला. मात्र हा निधी खर्च करण्यासाठी तीन वर्षे लागले.
या पार्श्वभूमीवर नाशिक मनपाच्या 31 डिसेंबर 2018 रोजीच्या स्थायी समितीच्या सभेत ठराव केल्यानंतर पुढील वर्षी अर्थातच 13 सप्टेंबर 2019 रोजी संबंधित पुरवठादार कंपनीस कार्यादेश देण्यात आले होते. त्यानुसार बिटको रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन बसवण्यात आली. एमआरआय मशीनकरता 31 डिसेंबर 2018 च्या स्थायी समितीच्या ठरावानुसार 29 ऑगस्ट 2019 रोजी संबंधित पुरवठादार कंपनीस कार्यादेश देण्यात आले होते. दोन्ही यंत्रे बसवल्यानंतर एस्ट्रोलेशनचे काम झाले मात्र चालवणार कोण हा प्रश्न असल्यामुळे दोन्ही मशीन बंद पडले होते.
मनुष्यबळाची अडचण लक्षात घेत खाजगीकरणातून चालवण्याचा निर्णय झाला. त्यासाठी निविदा काढल्यानंतर दिली स्थित स्टार इमॅजिन या आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने चालवण्यास होकार दिला आहे या कंपनीची पालिकेने करारनामा केला असून त्यानुसार कामकाज पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे त्यामुळे नाशिक येथील रुग्णांना 40 टक्के दरामध्ये सिटीस्कॅन आणि एमआरआय करता येणार आहे. त्यामुले नाशिकमधील अनेक रुग्णांना याचा लाभ घेता येणार असून खाजगी रुग्णालयातील अवाजवी दरामुळे या महत्वाच्या चाचण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. मात्र आता बिटको रुग्णालयात होणाऱ्या सुविधेमुळे नाशिककरांनी समाधान व्यक्त केले आहे.
मनपाला 50 टक्के वाटा
दरम्यान ही यंत्रणा चालवण्याच्या बदल्यात स्टार इमेजन कंपनी महापालिकेला एकूण उत्पन्नात 50 टक्के वाटा देणार आहे. त्यामुळे गोरगरिबांना कमी किमतीत चाचण्या उपलब्ध होणार असून पालिकेला देखील उत्पन्न मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिले आहे. तर निश्चितीसाठी मुंबई महापालिकेचे केईएम रुग्णालय, नाशिकमधील संदर्भ सेवा रुग्णालय, डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज यांच्याकडील दरपत्रक मागवले आहेत.